पुणे : येरवडा गावातील पर्णकुटी टेकडीवरील श्री तारकेश्वर मंदिरातील दानपेट्या फोडून चोरट्यांनी दोन लाखांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत मंदिराचे विश्वस्त सुधीर वसंतराव वांबुरे (वय ६७, रा. शनी मंदिराजवळ, येरवडा गाव) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवडा गावात पर्णकुटी टेकडीवर श्री तारकेश्वर मंदिर आहे. चोरट्याने मंगळवारी (ता. ४) या मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्याने मंदिरातील सहा दानपेट्या फोडून सुमारे दोन लाख रुपयांची रोकड चोरी केली.
याबाबत माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक पोलिस आयुक्त आरती बनसोडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार स्वप्नील पाटील करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.