पुणे महापालिकेच्या बंडगार्डन पाणी पुरवठा विभागातील दोन अभियंत्यांना लाचलुचपत विभागाच्या (एसीबी) पथकाने सोमवारी सायंकाळी वीस हजार रुपयांची लाच घेताना अटक केली.
पुणे - पुणे महापालिकेच्या बंडगार्डन पाणी पुरवठा विभागातील दोन अभियंत्यांना लाचलुचपत विभागाच्या (एसीबी) पथकाने सोमवारी सायंकाळी वीस हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. दरदिवशी पाच पेक्षा जास्त पाण्याचे टँकर भरून देण्यासाठी दोघांनी लाचेची मागणी केली होती.
उपअभियंता मधुकर दत्तात्रय थोरात (वय 56), कनिष्ठ अभियंता अजय भारत मोरे (वय 37) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.त्यांच्या विरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी 63 वर्षीय व्यवसायिकाने तक्रार दिली होती."एसीबी"ने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. तर उपअभियंता मधुकर थोरात व कनिष्ठ अभियंता अजय मोरे हे दोघे महापालिकेच्या बंडगार्डन पाणीपुरवाठ विभागात काम करतात. पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले पास त्यांनी महापालिकेच्या कार्यालयातून घेतले आहे. प्रत्येक टँकर भरताना त्यांना एक पास द्यावा लागतो.
मात्र, पास देऊन देखील अभियंता मोरे याने दरदिवशी पाच पेक्षा अधिक टँकर भरून हवे असतील तर महिन्याला 20 हजार रुपयांची मागणी केली. तसेच थोरात याने देखील तक्रारदार यांच्या अनामत रक्कमेचे बील काढण्यासाठी 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. दाखल तक्रारीची पडताळणी केली त्यावेळी, दोघानी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सोमवारी सायंकाळी बंडगार्डन पाणीपुरवठा कार्यालयात सापळा रचून दोघांना प्रत्येकी 20 हजार रुपयांची लाच घेताना पथकाने पकडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.