मंचर : कानून के हाथ लंबे होते है! हा सिनेमा किंवा सिरियलमध्ये हमखास वापरला जाणारा डायलॉग गुन्हेगार विसरतात. सिनेमातल्या एखाद्या गुन्ह्याची पुनरावृत्ती करत कायद्यापासून पळ काढतात. आंबेगाव तालुक्यात अशीच एक घटना समोर आली आहे. एका गुन्हेगाराने महिलेबरोबर लग्न करण्याचे नियोजन केले होते. तिला आपली बहादुरकी दाखविण्यासाठी तरुणाचा निर्घुणपणे खून केला. पण आता विजय अनिल सूर्यवंशी (वय ३५ रा.जाधववाडी, ता. जुन्नर) व काजल रमेश दाते (वय 27 रा. कवठे ता. शिरूर) यांचे लग्न होण्याऐवजी आरोपींची वरात मंचर पोलिस ठाण्यात पोहचली असून ते जेलची हवा खात आहेत.
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विवेक पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंबाते, गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरिक्षक पद्माकर घनवट, पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, सह्हायक पोलिस निरीक्षक लहु थाटे, पोलिस उपनिरीक्षक सागर खबाले, पोलिस नाईक नवनाथ नाईकडे, यांच्यासह तीन पोलिस पथकांनी खुनाचा शोध लावला.
पोलिस तपासात धकादायक माहिती पुढे आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक नेते सचिन जाधव रा. धामणी, ता. आंबेगाव) यांच्या खुनातील विजय सूर्यवंशी आरोपी आहे. बाळशीराम दगडू थिटे, (रा. धामणी ता. आंबेगाव) व जाधव यांचे आर्थिक व्यवहारावरून वाद झाला होता. थिटे यांची मेव्हणी काजल दाते हिला खुश करण्यासाठी व आपण सिनेमातील भाईप्रमाणे काम करतो. हे दाखविण्यासाठी विजय सूर्यवंशीने जाधव यांच्यावर कुऱ्हाडीने पहिला वार करून त्यांचा खून केला. गुन्हा लपवण्यासाठी नामी शक्कल लढवली. घटना स्थळापासून ६० ते ६५ किलोमीटर अंतरावर पारनेर तालुक्यात मृतदेह व गाडीची व विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पण येवढे करूनही खुनाला वाचा फुटली. लग्नाचे स्वप्न पाहणारा विजय व काजल तुरंगात आहेत. जाधव यांच्या खिशातील दीड हजार रुपये, दोन सोन्याच्या अंगठ्या व सोन्याची चैन आरोपींनी काढून घेतली होती. सोन्याचे दागिने मंचर पोलिसांनी जप्त केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.