Pune Glass Factory Accident : काचेच्या कारखान्यात माल उतरवताना चौघांचा मृत्यू! येवलेवाडीतील घटना

Four People Died in Pune Glass Factory Accident : येवलेवाडीतील काचेच्या कारखान्यात घडलेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी दोघे गंभीर अवस्थेत आहेत
four People Died in Pune Glass Factory
Pune Glass Factory Accidentsakal
Updated on

कोंढवा : येवलेवाडीतील एका काचाच्या कारखान्यात काचा उतरवताना पाच कामगार अडकल्याची घटना रविवारी (ता. २९) दुपारी घडली. काचा उतरवताना काचा फुटल्याने त्यामध्ये हे कामगार अडकल्याची माहिती कोंढवा अग्निशामक दलाला मिळाली असता अग्निशमन दलाच्या जवानांनी सहाही कामगारांना गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात रवाना केले. मात्र, रुग्णालयात गेल्यावर चार कामगारांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

विकास कुमार (वय २३), पवन कुमार (वय ४३), धर्मेंद्र कुमार (वय ४०) अमित कुमार (वय २७) सर्व राहणार उत्तरप्रेदश अशी मृतांची नावे असून पिंटू इरकल (वय ३०) आणि आणखी एकजण जखमी आहे. यापैकी आणखी एकाची अवस्था गंभीर आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती कोंढवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक मानसिंग पाटील यांनी दिली आहे. पुढील तपास कोंढवा पोलिस करत आहेत.

कंटेनरमध्ये दहा बाय सात फूटांच्या काचा होत्या. त्या काचा बाहेरुन आणण्यात आल्या होत्या. त्या काचा उतरविण्याचे काम कामगारांमार्फत सुरु होते. या काचा कंटेनरमध्ये दोन्ही बाजूला उभ्या असतात. मात्र, काम सुरु असताना या काचा कंटेनरमध्येच पडल्या आणि त्यामध्ये कामगार अडकले, त्यानंतर आम्हाला माहिती मिळाली आणि आम्ही घटनास्थळी पोहोचून क्रेन आणि रेस्क्यू उपकरणांच्या मदतीने त्यांना बाहेर काढल्याची माहिती कोंढवा अग्निशामक दलाचे प्रमुख समीर शेख यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.