पुणे - अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे नदीपात्रात बुडालेल्या दोघांचे जीव वाचले. भिडे पूल व कर्वेनगर परिसरात या घटना घडल्या.
नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने शुक्रवारी दुपारी दीड वाजता भिडे पूलाजवळून पाण्यामध्ये एक नागरिक वाहून जात असल्याची माहिती अग्निशामक दलास मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या कसबा पेठेतील अग्निशमन केंद्राचे प्रमुख कमलेश चौधरी आणि जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी तत्काळ शोध मोहिम राबविली.