घोड धरणातून दोन हजार २६० क्यूसेकने विसर्ग; धरणात ९५ टक्के पाणीसाठा

ghod dam.jpg
ghod dam.jpg
Updated on

न्हावरे (पुणे) : चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरण ९५ टक्के भरल्याने धरणाचे चार दरवाजे दोन फुटांनी उघडण्यात आले. धरणातून नदीपात्रात दोन हजार २६० क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. घोड धरणाची क्षमता ७ हजार ६३८ दशलक्ष घनफूट आहे. धरणाच्या पाण्यामुळे शिरूर-श्रीगोंदा तालुक्यातील वीस हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते.

शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसह पंधरा गावांना तसेच श्रीगोंदा शहर व तालुक्यातील दहा गावांना याच जलाशयातून पाणी पुरवठा होता. मागील पंधरा-वीस दिवसापासून कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. कुकडी प्रकल्पातून नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मागील आठ दिवसापासून घोडमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

शनिवारपासून (ता. २९) डिंभे धरणातून दोन हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आल्याने घोड धरणात ९५ टक्के पाणी साठा झाला आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. ज्याप्रमाणे डिंभे धरणातून अधिकचे पाणी येईल. त्याप्रमाणे घोड जलाशयातील पाणी पातळी संतुलित ठेवण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती घोडचे शाखा अभियंता किरण तळपे यांनी दिली.                   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.