भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. सोलापूर रस्त्यावर मांजरी फाटा (१५ नंबर) चौकात आज सकाळी साडेच्या सुमारास हा अपघात झाला.
पुणे (उंड्री) - भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. सोलापूर रस्त्यावर मांजरी फाटा (१५ नंबर) चौकात आज (सोमवार, दि. ६ जून, २०२२) सकाळी साडेच्या सुमारास हा अपघात झाला.
संजय ज्ञानदेव भोसले (वय ५२, रा. शेवाळेवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सचिन रेवननाथ पठाडे (वय ३७, रा. मांजरी ग्रा.पं. कार्यालयासमोर, मांजरी फार्म, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार ट्रकचालक आस मोहम्मद अनिस अहमद (वय २७, रा. ढक्का, थाना सेदनगली उझारी, जि. अमरोहा, उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, मयत संजय ज्ञानदेव भोसले सिरम इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीला असून, सकाळी दुचाकीवरून कामाला जात होते. त्यावेळी मांजरी फाटा चौकात पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील ट्रकची दुचाकीचालकाला धडक बसून अपघात झाला. दुचाकीचालक रस्त्यात पडल्यानंतर ट्रकचे चाक दुचाकीचालकाच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हडपसर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी पुढील तपास करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.