महाराष्ट्रात चाललंय तरी काय? दोन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; अल्पवयीन मुलानं खोलीत नेलं अन्..

Rajgad Police Station : महामार्गालगत असणाऱ्या एका गावात पीडित अल्पवयीन बालिका तिच्या आईसह राहत असून नराधम आरोपी हा त्यांच्या शेजारी राहतो.
Crime News
Crime Newsesakal
Updated on
Summary

याबाबत मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अल्पवयीन मुलीवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

नसरापूर : भोर तालुक्यातील एका गावात अवघे दोन वर्ष वय असलेल्या बालिकेवर (Minor Girl) एका नराधम अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजगड पोलीस ठाण्याच्या (Rajgad Police Station) हद्दीतील पुणे-सातारा महामार्गावरील (Pune-Satara Highway) एका गावात मंगळवारी (ता. 17) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. या घटनेची माहिती समजताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नराधम आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Crime News
केवळ दैव बलवत्तर, चंद्रकांत पाटील अपघातातून बचावले! भरधाव गाडीची ताफ्यातील मोटारीला धडक, सुरक्षारक्षक जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गालगत असणाऱ्या एका गावात पीडित अल्पवयीन बालिका तिच्या आईसह राहत असून नराधम आरोपी हा त्यांच्या शेजारी राहतो. एकमेकांचे ओळखीचे असल्याने दोन वर्षीय अल्पवयीन मुलगी संबंधित अल्पवयीन आरोपीकडे खेळण्यास जात असे. ता. 17 रोजी लहान मुलीची आई सकाळी कपडे धूत असताना नराधाम आरोपीने मुलीला त्याच्या खोलीत घेऊन आतून कडी लावून घेतली.

त्यानंतर बालिकेच्या रडण्याचा आवाज आल्याने मुलीच्या आईने बंद असलेल्या खोलीकडे धाव घेऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने दरवाजा उघडला नाही. आरडाओरडा केल्यानंतर अल्पवयीन मुलगा बाहेर आला व मुलीच्या आईला कोयत्याने जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळून गेला होता. पोलिसांना घटना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले.

Crime News
Tuljapur Crime : तुळजापुरात अल्पवयीन मुलीवर 65 वर्षाच्या नराधमानं केला अत्याचार; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

याबाबत मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अल्पवयीन मुलीवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार नराधम अल्पवयीन मुलावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस फौजदार वृषाली देसाई करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.