Uddhav Thackeray News: पुण्यातील जाहीर सभेआधीच ठाकरे गटाला धक्का; 'या' नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Latest Marathi News: मे महिन्यात उद्धव ठाकरे खुद्द पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत.
Uddhav Thackeray and BJP
Uddhav Thackeray and BJP
Updated on

Pune News - पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक राहिलेले श्याम देशपांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केली आहे.

मे महिन्यात उद्धव ठाकरे खुद्द पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे ही सभा महाविकास आघाडीच्या वतीने असणार आहे. मात्र त्याआधीच ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

Uddhav Thackeray and BJP
Vladimir Putin : "युक्रेनविरुद्ध रशिया पराभूत झाल्यास पुतीन यांना द्यावा लागेल राजीनामा"

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित देशपांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

देशपांडे हे पुणे महापालिकेचे तीन वेळा नगरसेवक राहिलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी २०२२ मध्ये मुंबईतील एका भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्याने देशपांडे यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Uddhav Thackeray and BJP
Sheetal Mhatre Video: "व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मुख्य आरोपी प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे"

पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांची मे २०२२ मध्ये हकालपट्टी केली होती. देशपांडे हे २०००-२०१२ या कालावधीत कोथरूड भागातून नगरसेवक होते.

तर २००८-०९ मध्ये त्यांनी महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्षपद देखील भूषवले होते. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता देशपांडे यांच्याकडे कोणती जबाबदारी देणार याकडे लक्ष असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.