उद्धव ठाकरेंनी विचार केल्यास आम्हीही तयार - चंद्रकांत पाटील

"आम्ही हीच बाब १८ महिन्यांपूर्वी घसा कोरडा होईपर्यंत सांगत होतो"
BJP, Chandrakant Patil , Shiv Sena, Uddhav Thackeray
BJP, Chandrakant Patil , Shiv Sena, Uddhav Thackeray
Updated on

पुणे : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र अचानक समोर आल्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रात सरनाईक यांनी शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घ्यावं असं मत व्यक्त केलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी म्हटलं, जर उद्धव ठाकरे सरनाईकांच्या पत्रावर विचार करणार असतील तर आमचे पक्षश्रेष्ठी देखील त्याचा विचार करतील. पुण्यात पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी ही भूमिका मांडली. (Uddhav Thackeray considers Pratap Sarnaik letter we are ready Chandrakant Patil)

चंद्रकांत पाटील म्हणाले, "आम्ही शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याबाबत सकारात्मक काही बोललं की सामनात पुन्हा अग्रलेख लिहून येईल की यांचं सरकार नाही म्हणून यांच्या पोटात दुखतंय, यांना झोप लागतं नाही. म्हणून अशा विषयावर आम्ही म्हणणं काही बरोबर नाही. पण स्वतःच शिवसेनेचे आमदार आणि नेते प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे. उद्धवजींनी त्यांच्या विनंतीचा विचार केला तर आमचे पक्षश्रेष्ठी देखील विचार करतील."

अठरा महिन्यांपासून आम्ही हेच सांगत होतो

प्रताप सरनाईकांना जे वाटतंय तेच खरं म्हणजे आम्ही १८ महिन्यांपूर्वी घसा कोरडा होईपर्यंत सांगत होतो. ज्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्य घालवलं त्यांच्या मांडीला मांडी लावून कुठे बसता. त्यांची जर बेसिक थेअरीच अल्पसंख्यांकांचं लांगूलचालन करणं असेल तर अल्पसंख्यांकांचं लांगूलचालन आम्ही करणार नाही, या मुद्द्यावरच शिवसेना मोठी झाली. आमचे नेते १८ महिन्यांपूर्वीच सांगत होते की, काँग्रेससोबतची तुमची युती अशास्त्रीय आहे. तुमचे विचार, कार्यपद्धती एक नाहीत. पण सत्ता हा एक असा लोहचुंबक असतो जो सर्व विसरायला लावून खेचतो. पण एखाद्या नेत्यानं निर्णय केला आणि तो मान्य करत करत जगणं याच्या काही मर्यादा असतात, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेला राष्ट्रवादीपासून फारकत घेण्याचा सल्ला

"पण आता जर शिवसेनेत अशी अस्वस्थता असेल. सरनाईकांनी आपल्यावर कारवाई होणार आहे, याच्यातून वाचण्यासाठी त्यांनी हे पत्र लिहिलं असेल हे गरजेचं नाही. पण एक सच्चा शिवसैनिक म्हणून मनापासून त्यांना वाटतं असेल की हे आता फार झालं. पण तरीही आता शिवसेनेनं पुढील निवडणुकीपर्यंत जायचचं का? कारण शिवसेनेचा जो बालेकिल्ला होता त्या ठिकाणी सध्या राष्ट्रवादीवाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीसोबत जाऊ या संजय राऊत यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही" अशा शब्दांत चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला राष्ट्रवादीपासूनही फारकत घ्यावी असाच अप्रत्यक्ष सल्लाही दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()