Suresh Bhor : बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना रस्त्यावर उतरणार; सुरेश भोर

आंबेगाव तालुक्यात बिबट्याच्या उपद्रवाने शेतकरी त्रस्त
Uddhav Thackeray Shiv Sena prevent attacks leopard Suresh Bhor animal protect
Uddhav Thackeray Shiv Sena prevent attacks leopard Suresh Bhor animal protect sakal
Updated on

मंचर : “आंबेगाव तालुक्यात बिबट्याच्या उपद्रवाने शेतकरी त्रस्त झाला आहे. कोंबड्या, शेळ्या, पशुधन व मानवावरही बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. नागरिक भयभीत झाले आहेत.पण वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीच्या उपाययोजना करण्याएवजी उडवाउडवीची उत्तरे देतात. पिंजरा लावण्यास टाळाटाळ करतात.

याबाबत बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना हाती न घेतल्यास शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.” असा इशारा शिवसेनेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांना निवेदन दिले आहे.

ते म्हणाले “अवसरी खुर्द, गोवर्धन डेअरीच्या मागील बाजूला भरत भोर, रामदास शिंदे, रोहन भोर या शेतकऱ्यांनी अनेकदा बिबट्या पाहिला.याबाबत मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.पण पिंजरा लावला नाही. त्यानंतर रोहन भोर यांच्या चारचाकी गाडीसमोरून बिबट्या जात असल्याचा व्हिडिओ पाठविला.पण वन खात्यातील अधिकाऱ्यांचा प्रतिसाद मिळाला नाही.

मंचर-मुळेवाडी (ता.आंबेगाव) येथे पिंजरा आहे. ट्रॅक्टरमध्ये घेऊन या.असा निरोप वनकर्मचार्यांनी रोहन भोर यांना दिला. त्यानुसार पिंजरा आणला. त्यानंतर शेतकऱ्यांनीच बिबट्याला आमिष म्हणून पिंजऱ्यात शेळी ठेवावी. असेही सांगण्यात आले. हे काम वन खात्याचे आहे.

असे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. बुधवारी (ता.१८) पहाटे शेतकरी रामदास शिंदे यांच्या २५ कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या.जर याआधीच पिंजऱ्यात शेळी ठेवली असती तर बिबट्या जेरबंद झाला असता. शेतकऱ्याचे नुकसान वाचले असते. याभागात बिबट्याने अनेक कुत्री फस्त केली आहेत.”

“आंबेगाव तालुक्यात पशुधनाचे होणारे नुकसान वाचविण्यासाठी व बिबट्यांचा उपद्रव थांबविण्याच्या मागणीच्या पाठपुराव्यासाठी सोमवार (ता.३०) रोजी सकाळी ११ वाजता अवसरी पेठ घाटातील मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढून आंदोलन केले जाईल.”

- सुरेश भोर, जिल्हाप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

“अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील गोवर्धन दुध प्रकल्पाच्या मागील बाजूस लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी (ता.१८) रात्री भक्ष म्हणून शेळी किंवा मेंढी ठेवण्याचे नियोजन केले आहे. याभागात जनजागृतीसाठी वनकर्मचाऱ्यांची रात्रीची गस्त सुरु आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.”

- प्रदीप रौधळ, वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर (ता.आंबेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.