Pune: ठाकरे गटाची डेरिंगच निराळी, थेट पवारांकडे मागितली 'ही' विधानसभा

गावोगावी कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे.त्यामुळे महाविकास आघाडीत आमच्या पक्षाचा उमेदवार सहजपणे निवडून येईल
Pune: ठाकरे गटाची डेरिंगच निराळी, थेट पवारांकडे मागीतली 'ही' विधानसभा
Punesakal
Updated on

Latest Manchar News : आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघाची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला मिळावी.” अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पुणे जिल्हा प्रमुख सुरेश भोर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली.

तांबडेमळा-मंचर (ता.आंबेगाव) येथे शनिवारी (ता.२०) राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पक्षाच्यावतीने आयोजित केलेल्या जनता दरबारात भोर, जिल्हा समन्वयक राजाराम बाणखेले, तालुकाध्यक्ष दत्ता गांजाळे, उद्योजक नितीन भालेराव, मंचर शहर प्रमुख विकास जाधव, रोहन कानडे, चंद्रकांत भोर, प्रवीण टेमकर आदी कार्यकर्त्यांनी पवार यांची भेट घेतली.

Pune: ठाकरे गटाची डेरिंगच निराळी, थेट पवारांकडे मागीतली 'ही' विधानसभा
Sharad Pawar Atul Benke Meet: अजितदादांचा आमदार भेटला, पवारांची पहिली प्रतिक्रिया

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सुरेश भोर म्हणाले “आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघातून डॉ.अमोल कोल्हे यांना ९३ हजार मतदान झाले आहे. त्यापैकी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे ६० हजार मतदान हक्काचे आहे. गावोगावी कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे.त्यामुळे महाविकास आघाडीत आमच्या पक्षाचा उमेदवार सहजपणे निवडून येईल. असा विश्वास आहे.”

पवार साहेबांच्या दौऱ्याचे निमंत्रण आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांना नव्हते. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले पण महाविकास आघाडीचा धर्म पाळला पाहिजे. म्हणून पवार साहेब यांची भेट घेऊन त्याचे स्वागत केले. “येथील विधानसभा जागेबाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेऊ व कळवू.” असे पवार यांनी सांगितले आहे.

“आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघातून मी निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा. असे सांगितले आहे. त्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी गावोगावी संपर्क मोहीम सुरु केली आहे. जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.”

-सुरेश भोर, पुणे जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना.

Pune: ठाकरे गटाची डेरिंगच निराळी, थेट पवारांकडे मागीतली 'ही' विधानसभा
Sharad Pawar News: निलेश लंकेंच्या इंग्रजीतून शपथेवर पवारांची लक्षवेधी प्रतिक्रिया...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.