ठरलं तर! पुण्यात ठाकरेंचा 'चला जिंकूया' शिवसंकल्प मेळावा, स्वत: उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

Shivsena Pune: ‘केंद्र व राज्य सरकारचे अपयश’ या विषयावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मार्गदर्शन करणार आहेत
Uddhav thakre
ठरलं तर! पुण्यात ठाकरेंचा 'चला जिंकूया' शिवसंकल्प मेळावा, स्वत: उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शनsakal
Updated on

Pune News: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने ‘शिवसंकल्प’ अभियानाअंतर्गत ‘चला जिकूया’ हे शिवसेना गटप्रमुख मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. शनिवार (ता.३) गणेश कला व क्रिडा मंचात हे शिबिर पार पडेल.

शिबिराची जय्यत तयारी झाली असून शिवसैनिकांची मजबूत फळी मेळाव्यासाठी वेगाने काम करत आहे, अशी माहिती शहरप्रमुख गजानन थरकुडे व संजय मोरे यांनी गुरुवारी (ता. १) पत्रकार परिषदेत दिली. माजी पक्षनेते पृथ्वीराज सुतार यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व २१ विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, गटप्रमुखांना वैचारिक बोध मिळावा या उद्देशाने विविध विषयांवर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

Uddhav thakre
Shivsena: शिवसेनेने मागितला विकासकामांचा लेखाजोखा, उल्हासनगर महानगरपालिकेत धडक

विधानसभा निवडणुकीची तयारी कशी असावी, त्यातील बारकावे, प्रत्यक्ष काम करताना उपयोगी पडेल असे मार्गदर्शन केले जाणार आहे, असे मोरे यांनी सांगितले.

खासदार संजय राऊत, आमदार भास्कर जाधव, हे ‘संघटनात्मक भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, तर ‘केंद्र व राज्य सरकारचे अपयश’ या विषयावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मार्गदर्शन करणार आहेत. संपूर्ण जिल्ह्यातून मेळाव्यासाठी शिवसैनिक येणार आहेत.

Uddhav thakre
Shivsena Party Anniversary : मुंबईमध्ये आवाज कुणाचा? दोन्ही शिवसेना आज वर्धापनदिनाला करणार शक्तिप्रदर्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.