पळसदेव - पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा १०५ टक्क्यांवर (१२० टीएमसी) पोचला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा येवा २२ हजार क्युसेकहून अधिक असून, धरणातून नदीत ३१ हजार क्युसेक्सहून अधिक विसर्गाने पाणी सोडले जात आहे. महिनाभरात धरणातून सुमारे ९० टीएमसी पाणी नदीत सोडून देण्यात आले आहे. उजनी धरणासह पुण्यातील पावसातून धरणात आतापर्यंत सुमारे २०० टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.