Ujani Dam : ‘उजनी’तील पर्यटनात बोटीचा प्रवास सांभाळून; काळजी घेण्याचे आवाहन

उजनी धरणात बोट उलटून सहा प्रवासी बेपत्ता झाल्याच्या घटनेनंतर सध्याच्या बदलत्या वातावरणामध्ये बोटीतून प्रवास करणे जिवावर बेतू शकते, याचा प्रत्यय आला आहे.
Boat Damage by Storm
Boat Damage by Stormsakal
Updated on

पळसदेव - उजनी धरणात बोट उलटून सहा प्रवासी बेपत्ता झाल्याच्या घटनेनंतर सध्याच्या बदलत्या वातावरणामध्ये बोटीतून प्रवास करणे जिवावर बेतू शकते, याचा प्रत्यय आला आहे. त्यामुळे उजनीलगत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी बोटीतून प्रवास करताना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

उजनी धरण बांधणीनंतर इंदापूर तालुक्यातील २८ गावे धरणाच्या पाण्यात बुडीत झाली आहेत. सध्या उजनी धरणाची पाणी पातळी उणे ५९ टक्क्यांवर पोचली आहे. भीमा नदीचे पात्र असलेल्या ठिकाणी अद्यापही खोलवर पाणीसाठा आहे. गतवर्षी पाऊस कमी झाल्याने यंदा उजनीचे बॅकवॉटर लवकर रिकामे झाले आहे. त्यामुळे धरणात बुडालेली गावे उघडी झाली आहेत.

गावांच्या गावखुणा, प्राचीन मंदिर, नौकाविहार करण्याकडे पर्यटकांचा कल आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. मात्र, सध्या वादळी वारे व पाऊस याचा भरवसा राहिला नाही. सध्या वातावरणात मोठा बदल झाला असून, दिवसभर उन्हाचा चटका व दुपारनंतर वादळी वाऱ्यासह वळवाचा पाऊस हजेरी लावत आहे. अशा वादळी वाऱ्यात बोटीतून प्रवास करणे धोक्याचे ठरत आहे.

‘पळसनाथ’साठी रस्त्याचा पर्याय

इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील प्राचीन पळसनाथाचे मंदिर पाहण्यासाठी सध्या पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. हे मंदिर प्राचीन स्थापत्य कलेच्या अचाट सामर्थ्याचे दर्शन घडविणारे असल्यामुळे ते जास्त प्रसिद्ध झाले आहे. मंदिर पाहण्यासाठी विशेषतः शनिवार व रविवारी येणाऱ्या पर्यटकांची संख्या एरवीपेक्षा जास्त असते. मंदिरापर्यंत पोचण्यासाठी गावातून गेल्यानंतर नदीपात्रातून बोटीतून काही अंतर पार करावे लागते.

काही स्थानिक मच्छीमार येथे प्रवाशांना बोटीतून मंदिरापर्यंत ने-आण करण्याची सुविधा पुरवीत आहेत. मात्र, सध्याचे वादळी वाऱ्याचे व पावसाचे वातावरण असल्याने बोटीतून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. याऐवजी काळेवाडी क्र. १ येथून थेट मंदिरापर्यंत वाहनातून पोचता येत आहे.

वादळाने बोट तुटली

मागील तीन-चार दिवसांपूर्वी पळसनाथ मंदिर परिसरात आलेल्या वादळी वाऱ्याचा मच्छिमारांच्या काही बोटींना तडाखा बसला. यामध्ये पाण्याच्या किनाऱ्यावर लावलेल्या बोटी वाऱ्यामुळे उलटल्या. यात एका मच्छिमाराची बोट उलल्याने तुटली.

सध्याच्या वादळी वातावरणामध्ये बोटीतून प्रवासी वाहतूक करू नये, याबाबत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सूचना दिली आहे. काळेवाडी क्र. १ येथून थेट मंदिरापर्यंत रस्त्याची सोय असल्याने पर्यटकांनी बोटीऐवजी रस्त्याने मंदिरापर्यंत जावे.

- भूषण काळे, संचालक, कर्मयोगी साखर कारखाना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()