मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर बाणेर, कोरेगाव पार्कमधील अनधिकृत हॉटेल जमीनदोस्त; पुण्यात 19 ठिकाणी कारवाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीच अनधिकृत पब, बारवर बुलडोझर चढवा, असा आदेश काढला.
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde esakal
Updated on
Summary

कल्याणीनगर येथील (Pune Porsche Accident) घटनेमुळे रेस्टॉरंट, पब व्यावसायिकांचे आणि प्रशासनाचे सुमधुर संबंध चव्हाट्यावर आल्याने टीकेची झोड उठली.

पुणे : बाणेर, बालेवाडी, कोरेगाव पार्क भागात अनेक अनधिकृत रेस्टॉरंट, बार, रुफटॉप हॉटेल सुरु झाले आहेत. पण, त्यांच्यावर कारवाई केली जात नव्हती. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीच अनधिकृत पब, बारवर बुलडोझर चढवा, असा आदेश काढल्यानंतर महापालिकेला अनधिकृत बांधकाम केलेली हॉटेल सापडण्यास सुरुवात झाली आहे. आज दिवसभरात १९ ठिकाणी कारवाई करून ५६ हजार ६१ चौरस फुटाचे बांधकाम पाडून टाकण्यात आले आहे.

शहरातील बडे उद्योगपती, लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी शहरात अनधिकृत बांधकामे करून हॉटेल, रेस्टॉरंट, पब सुरु केले आहेत. पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभाग, महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने तेथे बिनधास्तपणे पहाटेपर्यंत दारूविक्री केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या तरी त्याची कोणीच दखल घेत नव्हते.

CM Eknath Shinde
NEET Exam Scam : 'नीट' घोटाळ्याची सिंधुदुर्गातही पाळेमुळे? 'हा' वादग्रस्त ठरलेला संशयित शिक्षक तब्बल 20 वर्षे होता जिल्ह्यात!

गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावरील एल थ्री पबमध्ये पहाटेपर्यंत पार्टी सुरु असल्याचे समोर आले. तेथे अंमलीपदार्थांचे सेवनही करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर पुण्यात खुलेआम ड्रग्ज पार्टी होत असल्याचे समोर आल्याने राज्य सरकारची डोकेदुखी वाढली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर महापालिकेने मंगळवारी (ता. २५) २९ ठिकाणी कारवाई करून ३६ हजार ८४५ चौरस फुटाचे बांधकाम पाडून टाकले. त्यानंतर आज (ता. २६) १९ ठिकाणी कारवाई करून रेस्टॉरंट, बारचे ५० हजार ६१ चौरस फुटाचे बांधकाम पाडून टाकले.

Baner Koregaon Park
Baner Koregaon Parkesakal

हे आहेत कारवाई झालेले रेस्टॉरंट

बाणेर-बालेवाडी : द कार्नर लाऊंज बार, एमएल सिटोबार, ईस्को बार, इलीफ्ट बार, ब्रीव्ह मर्चंट कॅफे, उरबो किचन बार, नेटीव बार, फिलेमिट बार, थ्रीमिस्टेक टर्स, डॉक यार्ड. कोरेगाव पार्क : ग्रेडमामस, दबाबा शाब, प्रिम रेस्टॉरंट, टेल्ली बार, शिवाजीनगर सोशल हॉटेल आदी ठिकाणी कारवाई करून ५६ हजार ६१ चौरस फुटाचे बांधकाम पाडून टाकले.

CM Eknath Shinde
'शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी तातडीने 50 हजार देणार'; शरद पवार गटातील 'या' आमदाराची घोषणा

आमचे हात बांधले गेले होते

शहरात अनधिकृत पब, बार, रेस्टॉरंट सुरु आहेत, रुपटॉप हॉटेल अनधिकृत आहेत हे माहिती आहे. तेथे कारवाईसाठी गेले की अनेक मोठे नेते फोन करून कारवाई थांबविण्यास सांगतात. आमच्यावर दबाव आणतात. अनेक ठिकाणी कारवाई करता आली नाही, तेथे केली त्यातील काही ठिकाणी अर्धवटच कारवाई झाली. त्यामुळे माहिती असूनही बांधकाम पाडता येत नाही. आमचे हात बांधले गेलेले असतात. मात्र, अशा घटना घडल्यानंतर आम्‍हाला कारवाई करण्याची मोकळीक मिळते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.