Terrorist Activities : पुण्यात दहशतवादी कारवायाची योजना आखण्यासाठी वापरलेली शाळा अनधिकृत

दहशतवादी कारवायाची योजना आखण्यासाठी वापर होत असल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुण्यातील ब्ल्यू बेल्स शाळेचे दोन मजले सोमवारी सील केले.
NIA
NIAsakal
Updated on
Summary

दहशतवादी कारवायाची योजना आखण्यासाठी वापर होत असल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुण्यातील ब्ल्यू बेल्स शाळेचे दोन मजले सोमवारी सील केले.

पुणे - दहशतवादी कारवायाची योजना आखण्यासाठी वापर होत असल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुण्यातील ब्ल्यू बेल्स शाळेचे दोन मजले सोमवारी सील केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिक्षण विभाग खडबडून जागे झाले. शिक्षण विभागातर्फे या शाळेची चौकशी करण्यात आली, त्यात ही शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आता शाळेविरूद्ध गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पुणे विभागाचे  शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिली.

राष्ट्रीय तपास यंत्रणेनेच्या कारवाईनंतर अखेर दुसऱ्या दिवशी शिक्षण विभागाने शिक्षणाधिकाऱ्यांच्या गटाला शाळेच्या चौकशीसाठी पाठविले. या चौकशीत शाळेकडे बोगस मान्यता प्रमाणपत्र असल्याचे आढळून आले. तत्कालीन शिक्षण उपसंचालक यांच्या स्वाक्षरीचे पत्र शाळेकडे आहे. परंतु या पत्राचा आवक जावक क्रमांक शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे उपलब्ध नाही. तसेच या शाळेकडे असणाऱ्या मान्यता पत्रावरही बनावट स्वाक्षरी असल्याचे उघड झाले आहे.

याबाबत उकिरडे म्हणाले, ‘ब्ल्यू बेल्स ही स्वयं अर्थसहाय्यित शाळा असून २०१९ मध्ये ही शाळा सुरू झाली आहे. या शाळेने  इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग शाळेत आहेत. या शाळेकडे उपलब्ध असणारे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांचे मान्यता प्रमाणपत्र बोगस आहे. राज्य शासनाच्या मान्यतेचे प्रमाणपत्र खरे आहे की खोटे हे तपासण्यात येणार आहे. दरम्यान या शाळेच्या चौकशीचा अहवाल राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना सादर केला आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.