उंडवडी - स्थळ : उंडवडी सुपे ( ता. बारामती) येथील टोल नाका, वेळ दुपारी बाराची. टोल नाक्यावर बारामतीच्या दिशेने आर.टी.ओ. कार्यालयाची एक लाल दिव्याची चार चाकी गाडी येते. आणि टोल नाका पास न करताच पुन्हा माघारी फिरुन टोलनाक्या जवळच थांबते.
गाडीत चालकासह खाक्या वर्दीत चौघेजण बसलेल्यापैकी एक साहेब टोल नाक्यावर काम करणा-या एका युवकाला व त्याच्या मॅनेजरला गाडीजवळ बोलावून घेतो. आणि दोघांना दमबाजी करतो. आणि त्या दोघांना ओळखपत्र मागतो. व कर्मचा-याला गाडीत बसवतो. मॅनेजरच्या मध्यस्थीनंतर त्या टोल कर्मचा-याला खाली उतरवून भर रस्त्यावर कान धरुन उठाबश्या काढायला लावतो.