धक्कादायक! पुण्यात १९ वर्षीय अविवाहित मुलीची रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात प्रसुती; अर्भक खिडकीतून फेकलं

फाइल फोटो
फाइल फोटोGoogle
Updated on

पुणे : शहरातील नऱ्हे भागातील एका रुग्णायात एका १९ वर्षीय अविवाहीत तरुणीने मुलीला जन्म दिल्यानंतर अर्भक खिडकीतून फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपली चाकणकर यांनी ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणी तपासाचे निर्देश दिल्याचं देखील सांगितलं आहे.

पुण्यात नऱ्हे भागातील एका हॅास्पिटलमधे १९ वर्षीय अविवाहित तरुणीने स्वच्छतागृहात मुलीला जन्म देऊन खिडकीतून बाहेर फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. नवजात अर्भकाचा यात मृत्यू झाला आहे, असे ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.

फाइल फोटो
Tim Cook News : कूक कूक कूक…; माधुरीनं घेतली अ‍ॅपलच्या सीईओची भेट, रंगली वडापाव पार्टी

तसेच राज्य महिला आयोगाने सदर प्रकरणात पोलिसांकडून माहिती मागविली आहे. सध्या या तरुणीवर उपचार सुरु असून याबाबत पोलिसांनी सखोल तपास करावा असे निर्देश आयोगाकडून देण्यात आले आहेत, असेही चाकणकर म्हणाल्या आहेत.

फाइल फोटो
Nitin Gadkari : दहशतवादी अकबर पाशाच्या सांगण्यावरुन गडकरींना धमकी; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.