Uruli Kanchan Crime : गटारी अमावस्येचे जेवण पडले महागात! मित्रानेच केले मित्रावर धारदार शस्त्राने वार; तिघांवर गुन्हा दाखल

गटारी अमावस्येला मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या युवकावर किरकोळ कारणारून धारदार शस्त्राने वार केल्याची घटना थेऊर (ता. हवेली) येथील दिल्लीवाला गोठा परिसरात घडली.
Murderer Attack
Murderer Attackesakal
Updated on

उरुळी कांचन - गटारी अमावस्येला मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या युवकावर किरकोळ कारणारून धारदार शस्त्राने वार केल्याची घटना रविवारी (ता.४) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास थेऊर (ता. हवेली) येथील दिल्लीवाला गोठा परिसरात घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

दीपक जाधव (वय २४), सनी पवार (वय-२४), विजय जाधव (वय १८, सर्व रा. थेऊर, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी सोहेल इसाक शेख (वय २०, रा. आलिफनगर, थेऊर, ता. हवेली) या युवकाने फिर्याद दिली आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोहेल शेख व त्यांचे मित्र सुरज शेख, प्रवीण चोपटे, विजय जाधव, सनी पवार, दीपक जाधव व विनायक गाढवे हे रविवारी रात्री गटारी अमावस्या निमित्त जेवणासाठी थेऊर नायगाव रस्त्यावरील दिल्लीवाला गोठा परिसरातील एका हॉटेलमध्ये गेले होते.

जेवण झाल्यानंतर शेख व दीपक जाधव, सनी पवार, विजय जाधव यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वादावादी होऊन हाताने मारहाण व शिवीगाळ झाली. या वेळी सनी पवार याने धारदार शस्त्राने फिर्यादी सोहेल शेख यांच्या डोक्यात वार करून त्याला जखमी केले. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी सोहेल शेख याने तिघांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार आरोपींच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()