उरुळी कांचन - पैशाच्या देवाण घेवाणीतून दोघांवर पिस्तूलमधून गोळ्या झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी अटक केलेल्या बापू उर्फ दशरथ विठ्ठल शितोळे व त्याचे चार साथीदार अशा पाच जणांना न्यायालयाने बुधवारपर्यंत (१८ सप्टेंबर) पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल (बंदूक), १७५ जिवंत काडतुस व पिस्टलचे ४० जिवंत काडतुस जप्ते केली आहेत.