पुणे - विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शहरात २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार शिक्षेस पात्र राहील.