पुण्यात 40 टक्के लस दुसऱ्या डोससाठी राखीव

Covid Vaccine
Covid VaccineSakal
Updated on
Summary

४५ वर्षांवरील नागरीकांना ४० टक्के डोस देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी सांगितले.

पुणे - दुसऱ्या डोससाठी पात्र ठरलेल्या नागरिकांची संख्या वाढू लागल्याने आता उपलब्ध लसीपैकी ४० टक्के लस ही दुसऱ्या डोस घेणाऱ्यांना नागरीकांना प्राधान्याने द्यावी. ४५ वर्षांवरील नागरीकांना ४० टक्के डोस देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी सांगितले. एका दिवसात पन्नास हजार नागरिकांचे लसीकरण करण्याची यंत्रणा महापालिकेने उभारली आहे. परंतु लसीचा पुरवठा होत नाही, असा शब्दात महापालिका प्रशासनानेही सोमवारी हतबलता दर्शविली. दरम्यान पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्या नागरिकांची गर्दी वाढू लागल्याने लसीकरणाच्या नियोजनात प्रशासनाकडून बदल करण्यात आला आहे.

Covid Vaccine
पुणे शहरात 187 तर जिल्ह्यात 826 नवे रुग्ण

केंद्र सरकारकडून मध्यंतर कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरीकांना दुसऱ्या डोस ८४ दिवसानंतर द्यावा, असे आदेश दिले होते. त्यामुळे महापालिकेने देखील उपलब्ध लसीपैकी चाळीस टक्के लस ही दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तर साठ टक्के लस दुसऱ्यासाठी राखीव ठेण्याचे आदेश दिले होते. अचानक हा बदल झाल्यामुळे त्याचा फटका लसीकरणाला बसला होता. अनेक केंद्रांवर लस शिल्लक राहत होती. परंतु आता दुसऱ्या डोससाठी प्राप्त झालेल्या नागरिकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे महापालिकेने लसीकरणाच्या नियोजनात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Covid Vaccine
छत्रपती शिवाजी महाराजांची जर्मनी, पॅरिस आणि अमेरिकेतील समकालीन चित्रे

56 केंद्रावर लस उपलब्ध

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत मंगळवारी ५६ केंद्रावर लसीकरण सुरू राहणार आहे. सर्व डोस हे कोविशील्ड लसीचे असून उपलब्ध साठ्यापैकी ४0 टक्के लस ही ४५ वर्षे वयावरील नागरिकांना पहिला डोस देण्यासाठी राखीव असणार आहे. तर कोव्हॅक्सिन लस ही १६ केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. ४५ वर्षे वयापुढील नागरिकांनी २३ मार्चपूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांना मंगळवारी लस मिळू शकणार आहे. ४० टक्के लस ही ४५ वर्षे पुढील नागरिकांना पहिल्या डोससाठी दिली जाईल. मात्र, यासाठी ऑनलाइन बुकिंग आवश्‍यक आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता त्याचे ऑनलाइन बुकिंग करता येऊ शकणार आहे. उर्वरित लस ही दिव्यांग, स्तनदा माता, हेल्थकेअर, फ्रंटलाइन वर्कर्स यांना प्राधान्याने दिली जाईल. याशिवाय ज्या नागरिकांनी नोंदणी केली नाही, परंतु ते केंद्रांवर आले असतील आणि लस शिल्लक असेल तर त्यांना ‘ऑन दि स्पॉट’ नोंदणी करून ती देण्यात येईल. तर सोळा केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे लसीकरण सुरू राहणार आहे. उपलब्ध साठ्यापैकी १७ मे पूर्वी ज्यांनी पहिला डोस घेतला आहे. अशा साठ टक्के नागरीकांना दुसरा डोस देण्यास प्राधान्य राहणार आहे. तर उर्वरित ४० टक्के लस ही ‘ऑन द स्पॉट’ नोंदणी करून दिली जाणार आहे

Covid Vaccine
नऊ महिन्यांत ३३ गुन्हेगारी टोळ्यांवर 'मोका' ची कारवाई

सोमवारी शहरात आतापर्यंतचे सर्वाधिक लसीकरण झाले. दररोज पन्नास हजार नागरिकांचे लसीकरण करता येईल, एवढी यंत्रणा महापालिकेने उभी केली आहे. प्रत्येक केंद्रांवर २०० ते २५० नागरिकांची लसीकरण करता येईल. तसेच दोनशे केंद्र एकाच वेळी सुरू करता येईल. परंतु त्यासाठी तेवढी लस उपलब्ध झाली पाहिजे.

- रूबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.