पुण्यात मोबाईलच्या प्रकाशातच रात्री लसवाटप

सरकारकडून शहरातील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेला लसपुरवठा केला जातो.
Vaccine Distribution
Vaccine DistributionSakal
Updated on

पुणे - शहरातील (Pune City) लसीकरण केंद्रांवर (Vaccination Center) फर्निचरसह इतर कामांवर नगरसेवकांनी लाखो रुपये खर्च करण्याचा सपाटा लावलेला असताना नारायण पेठेतील कलावती मावळे दवाखान्याचा वीज पुरवठा (Electric Supply) शुक्रवारी (ता. १८) रात्री तीन तास खंडित झाला. यामुळे मोबाईलच्या प्रकाशात १८५ केंद्रांसाठी लसवाटप (Vaccine Distribute) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. धक्कादायक बाब म्हणजे दवाखान्यातील जनरेटर गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. (Vaccine Distribution in Mobile Torch in Pune)

सरकारकडून शहरातील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेला लसपुरवठा केला जातो. ही लस कलावती मावळे रुग्णालयातील फ्रीजरमध्ये साठवली जाते. लसीकरणाचे नियोजन झाले की, परिमंडळ निहाय सर्व केंद्रांना ही लस वितरित केली जाते. ही प्रक्रिया रात्री अकरा ते बारापर्यंत सुरू असते. त्यामुळे आरोग्य विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत मावळे दवाखान्यात थांबावे लागते.

Vaccine Distribution
ॲक्शन घ्यायला सांगतो! गर्दीबद्दल अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त

महापालिकेला शुक्रवारी (ता. १८) रात्री शनिवारच्या लसीकरणाचे नियोजन करताना रोजपेक्षा जास्त उशीर झाला. त्यातच मुसळधार पाऊस सुरू असताना रात्री सव्वा नऊच्या सुमारास या भागातील वीजपुरवठा खंडित झाला, त्यामुळे लस वितरणात खोळंबा झाला. थोड्यावेळात वीजपुरवठा सुरळीत होईल असे वाटले, पण अर्धा तास उलटून गेला तरी वीज न आल्याने लस वितरित करणारे कर्मचारी व क्षेत्रीय कार्यालयाकडून लस घेण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी मोबाईलच्या बॅटरीच्या प्रकाशात लस वितरण सुरू केले. पुरेसा प्रकाश नसल्याने परिमंडळाच्या नावाने झालेली नोंद व प्रत्यक्षात लशीचे झालेले वितरणाचा ताळमेळ घालताना कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली.

शुक्रवारी १५५ केंद्रावर ४५ ते पुढील वयोगटासाठी कोव्हिशिल्ड, १५ ठिकाणी ३० ते ४४ वयोगटासाठी कोव्हिशिल्ड आणि १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस पुरविण्यात आली. वीज नसल्याने रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन, प्रत्येक केंद्राची लस ताब्यात घेताना कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. रात्री साडेअकरापर्यंत लसवाटप अंधारात सुरू होते; मात्र वीजपुरवठा सुरू झाला नाही. अखेर रात्री बाराच्या सुमारास वीज आल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. याबाबत आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्या संपर्क साधण्याचे प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Vaccine Distribution
पुण्याबाहेर गेल्यास, करावं लागेल होम क्वारंटाईन : उपमुख्यमंत्री

दरम्यान, मावळे दवाखान्यात जनरेटरची सुविधा आहे. मात्र, दुरुस्तीच्या कारणास्तव जनरेटर गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. हे जनरेटर विद्युत विभागाने दुरुस्त करणे अपेक्षित आहे; पण आरोग्य विभागाने त्यांच्याकडे अद्याप याबाबत तक्रार केली नसल्याचेही समोर आले आहे.

एका केंद्रासाठी ९ लाखाचा खर्च

शहरात नगरसेवकांकडून लसीकरण केंद्र सुरू केले आहेत. तेथे फर्निचर, संगणक, पिण्याचे पाणी आणि विजेची व्यवस्था करण्यासाठी किमान ९ लाखांच्या निविदा काढल्या आहेत. मात्र, लस वाटपाचे प्रमुख कार्यालयाकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.