वैभव वाळुंजला उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये 45 लाख रुपयांची शिष्यवृत्ती!

आंबेगाव तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील वैभव वाळुंज यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये तब्बल 45 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर
Vaibhav Walunj gets Rs 45 lakh scholarship for higher education in England
Vaibhav Walunj gets Rs 45 lakh scholarship for higher education in Englandsakal
Updated on

मंचर : बारावीनंतर उच्च शिक्षण घेणे आता सोपे राहिलेले नाही. महागडे शिक्षण हे आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या मार्गात अडथळा ठरते. पण जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर अहोरात्र अभ्यास करून वाळूंजनगर (ता.आंबेगाव) येथील शेतकरी कुटुंबातील दिव्यांगाचा मुलगा वैभव भाऊसाहेब वाळुंज (वय २४) आता पुढचे शिक्षण घेण्यासाठी सात समुद्रापार जाणार आहे. वैभवला इंग्लंड देशाची तब्बल ४५ लाख रुपयांची जेवेनिंग शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.(Chevening Scholarship) वडिल भाऊसाहेब व बहिण ऐश्वर्या दोघेही दिव्यांग आहेत. आई वैशाली शेतात काम करते. २१ व्या वर्षी विदेशात शिक्षण घ्यायचेच. असा निर्धार वैभवने केला होता. वैभवने प्रथम २०२० मध्ये जपानची शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी परीक्षा दिली. पण त्याचा नंबर लागला नाही. दुसऱ्या वर्षी पुण्यातील शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण सुरु असताना अमेरिकेच्या शिष्यवृत्तीचा अर्ज भरला.

१८ लाख रुपये शिष्यवृत्ती मंजूर होणार होती. पण त्यासाठी अट होती की, दोन प्रतिष्ठित व्यक्तींची शिफारस जोडण्याची. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची एकमेव शिफारस मिळाली. फक्त नऊ लाख रुपये शिष्यवृत्ती मंजूर झाली. उर्वरित नऊ लाख रुपयांची सोय होऊ शकली नाही. १०० टक्के शिष्यवृत्ती मिळाली तरच विदेशात जायचे. हे उद्दिष्ट ठेवून तीन वर्ष काश्मीर, बस्तर, यवतमाळ, आसाम, मेघालय, गडचिरोली अश्या दुर्गम भागात “जनजाती संशोधक” नीती आयोगाचा व संसदेतील खासदारांच्या कायदेमंडळाच्या कामाचा अभ्यास केला. २०२१ मध्ये इंग्लंड देशातील शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरला.शिष्यवृत्तीसाठी जगातील १६० देशातून जवळपास ६० हजार विद्यार्थ्यांनी जेवेनिंग शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरले होते. त्यातून केवळ दोन टक्के विद्यार्थी मुलाखतीमध्ये पात्र झाले.”

बहिण ऐश्वर्या उजव्या हाताने व वडील डोळ्याने दिव्यांग आहेत. ऐश्वर्या मुंबई येथील सायन हॉस्पिटलमध्ये एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाच्या शिक्षण घेत आहे. वडील भाऊसाहेब दिव्यांगांना भेटून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देत आहेत. सप्टेंबर महिन्यात वैभव इंग्लडला जाणार आहे.सरपंच विजय शिनलकर, उपसरपंच महेंद्र वाळुंज व शिक्षक सुदाम खैरे पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्यामुळेच सात समुद्रापलीकडे शिक्षणासाठी जाण्याची संधी मिळाली. राज्य लोकसेवा व केंद्रीय लोकसेवा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन.

“धामारी (ता.शिरूर) येथे जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक व कान्हूर मेसाई येथे माध्यमिक शिक्षण.चार्टर्ड इंजिनियरिंग अभियंता व बी.ए व पत्रकारिता या तीन अश्या पदव्या कंपनीत काम करून बाहेरून पूर्ण केल्या. कुठलेच क्लासला गेलो नाही. यापुढे राज्य व केंद्रीय लोक सेवा आयोग परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.”

- वैभव भाऊसाहेब वाळुंज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.