तीन घरफोड्यामधील १ लाख ८७ हजारांचा ऐवज हस्तगत; चोरट्यांवर गुन्हे

वालचंदनगर पोलिसांनी तीन घरफोड्यांचा तपास करुन दोन चोरट्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
Crime
Crime Sakal
Updated on

वालचंदनगर : वालचंदनगर पोलिसांनी तीन घरफोड्यांचा तपास करुन दोन चोरट्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील एकाकडून १ लाख ८७ हजार ४१० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यामध्ये पाेलिसांना यश आले असून यामध्ये पावणेपाच ताेळे सोन्याचे दागिने व ११ हजार रुपयांच्या रोख रक्कमेचा समावेश आहे. (Pune District Rural Crime News)

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये डिसेंबर व जानेवारी महिन्यामध्ये तीन घरफोड्या झाल्या होत्या. यामध्ये अज्ञात चोरट्यांनी १८ डिसेंबर २०२१ रोजी गोतोंडीमध्ये अफसाना दिलावर शेख यांच्या घरी भरदिवसा चोरी करुन १ लाख ३२ हजार ५६० रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता.यामध्ये ४१ हजार रुपये रोख रक्कम व दीड तोळे सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता. २९ डिसेंबर २०२१ रोजी सणसर मध्ये मुस्ताफा अकबर सय्यद यांच्या घरी चोरी करुन १ लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.यामध्ये सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कमेचा समावेश होता.

तसेच सणसर गावामध्येच २७ जानेवारी २०२२ रोजी संभाजी शिवाजी आडके यांच्या घरी चोरी करुन ४७ हजार ८०० रुपयांचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम लंपास केली होती. आडके यांच्या घरफोडीचा वालचंदनगर पोलिसांनी शिताफितीने तपास केला. याप्रकरणी नियोजन उर्फ बेड्या संदीप भोसले (वय २८,रा.सोनगाव ता.बारामती) याला जेरबंद केले. त्याला पाेलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी सणसरमधील दोन ठिकाणी व गोतोंडीमध्ये एका ठिकाणी लखन बापू उर्फ विजय काळे (वय २५,र.आटपाडी,जि.सांगली) याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.

भोसले याला अटक करुन त्याच्याकडून वरील ऐवज हस्तगत केला आहे. भोसले याला न्यायालयाने जामीन मंजूर केला असून लखन काळे हा फरारी असून त्याच्या मागावरती पोलिस आहेत. याप्रकरणी पुणे जिल्हाचे पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिराप्पा लातुरे, उपपोलिस निरीक्षक अतुल खंदारे,नितीन लकडे, साहय्यक फौजदार शिवाजी निकम, रविंद्र पाटमास,मोहन ठोंबरे, शैलेश स्वामी, विनोद पवार,अमर थोरात, प्रमोद भोसले,किसन बेलदार यांनी प्रयत्न करुन तपास लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.