वाल्हेकरांनो, गाव कोरोनामुक्त झालं तरी काळजी घ्या; नाहीतर...

वाल्हेकरांनो, गाव कोरोनामुक्त झालं तरी काळजी घ्या; नाहीतर...
Updated on

वाल्हे (पुणे) : अकरा दिवसांपूर्वी वाल्हे येथील मुकदमवाडीत मुंबई येथून आलेल्या एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे संपूर्ण गाव चिंताग्रस्त झाले होते. त्याला कोविड केअर सेंटरला हलविल्यानंतर गावात कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केल्या. अखेर शुक्रवारी (ता. 17) त्याने कोरोनावर मात करून आपल्या घरी परतला. त्यामुळे वाल्हेकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

गावाच्या शिवेबाहेर विविध ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडत असताना वाल्हेकर मात्र, निश्चिंत होते. दरम्यान, मुंबई येथे वास्तव्यास असलेली एक व्यक्ती चौदा दिवसांपूर्वी आपल्या मुळगावी आली. थोडासा त्रास जाणवू लागल्याने दवाखान्यात दाखल झाली. त्यावेळी त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह निघाली. त्यामुळे वाल्हेकरांच्या पायाखालची वाळू सरकली. तातडीने वाल्हे ग्रामपंचायत, पोलिस प्रशासन आणि कोरोना सुरक्षा समिती यांनी तत्परतेने येथील मुकदवाडीसह गावात निर्जंतुकीकरण करून घेत आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मदतीने मुकदमवाडीसह गावाचादेखील सर्वे केला. दरम्यान, शुक्रवारी कोरोनाबाधीत व्यक्ती बरी होऊन घरी परतली असून, त्यांच्या जवळच्या तीन व्यक्तींचे देखील कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने वाल्हेकरांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटुन वाल्मिकऋषींची ही वाल्मिकभूमी 
अखेर कोरोनामुक्त झाली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या बाबत बोलताना वाल्हेचे सरपंच अमोल खवले व ग्रामविकास अधिकारी बबन चखाले म्हणाले, की गावातील एकमेव कोरोना पॉझिटिव्ह असलेला रुग्ण बरा झाल्याने गावाच्यादृष्टीने ही आनंदाची बाब आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. गावात बाहेरून आलेल्या जवळपास 65 व्यक्तींची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाइन केलेले आहे. तेदेखील स्वत: काळजी घेत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत व महसूल कर्मचारी हे सर्व प्रशासकीय कर्मचारी गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आघाडीवर लढत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी निष्काळजीपणे न वागता सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे, सॅनिटाझर वापरणे, लग्न, पूजा, वाढदिवस आदी गर्दीचे कार्यक्रम टाळणे अपेक्षित असून, ही काळजी घ्यावी अन्यथा येणाऱ्या कोरोना आपत्तीतून आपणास कोणीही वाचवू शकणार नाही, असे मत पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केले आहे.

Edited by : Shivnandan Baviskar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.