निरगुडसर - आईची मोल मजुरी आणि वडिलांच्या शेतातील कष्टामुळे शेतकरी कुटुंबातील कन्येने पोलिसपदाला गवसणी घातली आहे. अपार कष्ट, सुविधांचा अभाव, अशा प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करत वळती (ता. आंबेगाव) येथील आश्लेषा शांताराम भोर हिने कुठलाही क्लास न लावता उच्च शिक्षण घेता घेता लायब्ररीमध्ये अभ्यास करून खाकी वर्दी पटकावल्याने सर्व स्तरातून तीचे कौतुक होत आहे.