Pune Metro : वनाज ते रामवाडी ३६ मिनिटांत; मेट्रो प्रवाशांना ३० रुपयांत करता येणार १५ किलोमीटरचा प्रवास

वनाजवरून नगर रस्त्यावरील रामवाडीला जाण्यासाठी मेट्रोने फक्त ३६ मिनिटे लागणार असून, त्यासाठी प्रवास भाडे ३० रुपये असेल.
Vanaz to Ramwadi in 36 minutes Metro passengers can travel 15 km for Rs 30
Vanaz to Ramwadi in 36 minutes Metro passengers can travel 15 km for Rs 30Sakal
Updated on

पुणे : वनाजवरून नगर रस्त्यावरील रामवाडीला जाण्यासाठी मेट्रोने फक्त ३६ मिनिटे लागणार असून, त्यासाठी प्रवास भाडे ३० रुपये असेल. बुधवारी (ता. ६) दुपारी १२ वाजल्यापासून नगर रस्त्यावरील प्रवाशांना मेट्रोचा वापर करता येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने रूबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो मार्गाचे उद्‍घाटन बुधवारी सकाळी दहा वाजता होणार आहे. पंतप्रधानांनी झेंडा दाखविल्यावर रूबी हॉल क्लिनिक स्थानकावरून आणि रामवाडी स्थानकावरून मेट्रो निघेल. त्यानंतर लगेचच प्रवासी वाहतुकीला प्रारंभ होईल.

उद्‍घाटनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी रूबी हॉल क्लिनिक आणि रामवाडी स्थानकावर डिजिटल डिसप्ले फलक असतील, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच पिंपरी-चिंचवड-निगडी मेट्रो मार्गाचे भूमिपूजनही या प्रसंगी होणार आहे. या प्रसंगी मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, विनय अग्रवाल, हेमंत सोनवणे उपस्थित होते.

बसद्वारे वाघोलीला जोडणार

रामवाडी स्थानकामुळे मेट्रो आता नगर रस्त्याला कनेक्ट झाली आहे. आता ‘पीएमपी’शी चर्चा करून फिनिक्स मॉल, खराडी, चंदननगर आणि वाघोली हा भाग ‘पीएमपी’च्या बसने रामवाडी मेट्रो स्थानकाला जोडण्यात येईल.

त्यासाठी ‘पीएमपी’ची बससेवा अल्पावधीतच सुरू होईल. त्यामुळे प्रवासी वाघोलीवरून रामवाडीपर्यंत बसने प्रवास करतील. तेथून पुढे मेट्रो मार्गाने पिंपरी-चिंचवड किंवा महापालिका, शिवाजीनगर, डेक्कन जिमखाना परिसरात पोचू शकतील. रामवाडीतून मेट्रो सुरू झाल्यामुळे प्रवाशांचा वाहतूक कोंडीत जाणारा वेळ वाचेल, असेही हर्डीकर यांनी सांगितले.

आज सकाळी ९ ते १२ दरम्यान ब्लॉक

वनाज-रामवाडी मार्गावर उद्‍घाटनाच्या कार्यक्रमामुळे शिवाजीनगर न्यायालय ते रूबी हॉल मार्गावर बुधवारी सकाळी ९ ते दुपारी १२ दरम्यान मेट्रो वाहतूक बंद असेल. नव्या मार्गाचे उद्‍घाटन झाल्यावर दुपारी बाराच्या सुमारास वाहतूक पूर्ववत होईल.

प्रवासी १५ हजारांनी वाढणार

रामवाडीवरून प्रवाशांना पिंपरी-चिंचवड, वनाजपर्यंत जाता येणार आहे. तसेच शहराच्या मध्य भागात पोचण्यासाठी शिवाजीनगर, महापालिका भवन, डेक्कन जिमखाना, संभाजी पार्क आदी स्थानकांवरही उतरता येईल. यामुळे नव्या मार्गामुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत किमान १५ हजारांनी वाढ होईल, अशी अपेक्षा हर्डीकर यांनी व्यक्त केली.

शेअर रिक्षाचाही पर्याय

रामवाडी स्थानकापासून फिनिक्स मॉल, चंदननगर, खराडी या मार्गांसाठी शेअर रिक्षा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी रिक्षा संघटनांशी चर्चा सुरू आहे. शेअर रिक्षामुळेही प्रवाशांचा वेळ वाचून कमी वेळात त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी पोचता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.