पुणे - वंदे भारत एक्स्प्रेसच्या एकाच रेकच्या (डब्यांचा संच) माध्यमातून दोन शहरांना सेवा दिली जाणार आहे. पुणे-कोल्हापूर व पुणे-हुबळी अशी सेवा सुरू होत आहे. पुणे स्थानकावर सोमवारी (ता. १६) पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन होईल. त्याच दिवशी कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचेही उद्घाटन होणार आहे.
‘रेक लिंक’ केलेली देशातील ही पहिलीच वंदे भारत एक्स्प्रेस आहे. पुण्याहून कोल्हापूरला जाण्यासाठी केवळ पाच तास २५ मिनिटे, तर हुबळीला अवघ्या आठ तास २५ मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. सध्या रेल्वेने कोल्हापूरला जाण्यासाठी सात ते साडेसात तासांचा वेळ लागतो. वंदे भारतमुळे प्रवाशांच्या वेळेत दोन तासांची बचत होणार आहे.