Pune Railway: अखेर पुण्याच्या ट्रॅकवर धावणार ‘वंदे भारत एक्स्प्रेस'; 'या' तारखेला होणार उद्‌घाटन सोहळा!

Latest Pune News: देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी हुबळी विभागाची असणार आहे. पुण्यात वंदे भारत एक्स्प्रेस दाखल झाल्यावर डब्यांची स्वच्छता केली जाईल.
: वीस डब्यांची पहिली ‘वंदे भारत’ सज्ज, मुंबई - अहमदाबाद प्रवास पाच तासांत पूर्ण!
Vande Bharat Railwaysakal
Updated on

Pune Vande Bharat Train: पुण्याच्या ट्रॅकवर अखेर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यावर पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस १५ सप्टेंबरपासून धावणार आहे. या रेल्वेला आठ डबे असून, वंदे भारत एक्स्प्रेसची ही अद्ययावत गाडी असणार आहे.

धारवाड, बेळगाव, कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा व कराड या स्थानकांवर या गाडीला थांबा देण्यात आला. पुणे स्थानकावर सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी उद्‌घाटन सोहळा होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.