पुणे : लातूर येथील मराठवाडा कोच फॅक्टरीतून वंदे भारत एक्स्प्रेसच्या स्लीपर (शयनयान) डब्यांसाठी प्रवाशांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. लातूर येथील कोच फॅक्टरीमध्ये १९२० डब्यांची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी ‘किनेट’ या कंपनीसोबत रेल्वे बोर्डाचा करार झाला आहे.