Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत स्लीपर दोन वर्षांत ट्रॅकवर; २०२५ पासून होणार उत्पादन सुरू

वंदे भारत चेअर कारनंतर आता प्रवाशांना स्लीपर वंदे भारतची प्रतीक्षा आहे. मात्र त्यासाठी त्यांना आणखी किमान दोन वर्षे वाट पहावी लागणार आहे.
Vande Bharat Sleeper Train
Vande Bharat Sleeper Trainsakal
Updated on

पुणे - वंदे भारत चेअर कारनंतर आता प्रवाशांना स्लीपर वंदे भारतची प्रतीक्षा आहे. मात्र त्यासाठी त्यांना आणखी किमान दोन वर्षे वाट पहावी लागणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनचे उत्पादन करण्यापूर्वी त्याची प्रतिकृती तयार करावी लागणार आहे. त्यासाठी आणखी किमान वर्ष लागण्याची शक्यता आहे. लातूर येथील मराठवाडा कोच कारखान्यात वंदे भारतचे स्लीपर ट्रेन तयार होणार आहे.

अशी असेल एक्स्प्रेस

  • एकूण १६ डबे

  • १ फर्स्ट क्लास एसी डबा

  • ३ वातानुकूलित द्वितीय श्रेणी डबे

  • १२ वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे

अशी आहे स्थिती

  • पंतप्रधानांच्या हस्ते नुकतेच मराठवाडा कोच कारखान्याचे उद्‍घाटन

  • येथे १२० वंदे भारत रॅक तयार होणार, त्यासाठी विदेशी कंपनीसोबत करार

  • २०२५ पर्यंत प्रतिकृती तयार करण्याचे कंपनीकडून मान्य

  • विदेशी कंपनी व रेल्वे विकास महामंडळ लिमिटेड (आरव्हीएनएल) मिळून डब्यांचे उत्पादन करणार

  • पुढील वर्षापर्यंत प्रतिकृती तयार होईल त्यानंतर त्याची चाचणी होणार

  • प्रत्यक्षात २०२६मध्ये वंदे भारतच्या स्लीपर उत्पादनास सुरवात

लातूर येथील कोच फॅक्टरीत लवकरच प्रोटोटाइप तयार करण्याच्या कामास सुरवात होईल. त्यानंतर त्याची चाचणी होईल. याला काही कालावधी लागेल. त्यानंतर प्रत्यक्षात डब्यांच्या उत्पादनास सुरवात होईल.

- डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.