पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाबाबत सुरू असलेल्या तपासाचा आवाका मोठा असल्याने तो १४ दिवसांत पूर्ण होणार नाही. गंभीर गुन्हा असून त्याचा बारकाईने तपास गरजेचा आहे. त्यातून सत्य समोर येईल. एकदम १४ दिवसांची पोलिस कोठडी देणे योग्य ठरणार नाही, असे नमूद करत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी आरोपींना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.