Vanraj Andekar Last Post: दहीहंडीचा डान्स अन् चौथा श्रावण सोमवार ठरला शेवटचा... वनराज आंदेकरची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट काय होती?

Police arresting suspects in connection with Vanraj Andekar's murder in Pune lasat instagram post viral: पुणे पोलिसांनी या प्रकरणी तातडीटी कारवाई करत चार जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या मते, हा हल्ला घरगुती आणि मालमत्तेच्या वादातून झाला आहे. मृतक वनराज आंदेकर याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आंदेकर याच्या दोन बहिणी आणि त्यांच्या पतींवर शंका व्यक्त करण्यात आली आहे.
former corporator Vanraj Andekar murder
former corporator Vanraj Andekar murderesakal
Updated on

पुणे: पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते वनराज आंदेकर याच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. ही हत्या घरगुती आणि मालमत्तेच्या वादातून झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. वनराज आंदेकर याच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आंदेकर यांच्या दोन बहिणी आणि त्यांच्या पतींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शेवटच्या इंस्टाग्राम पोस्ट

हत्येच्या ठिकाणचा सीसीटीव्ही फुटेज हाती आला असून, त्यात १० ते १२ जणांनी आंदेकर यांच्यावर हल्ला केल्याचे दिसून येते. पोलिसांनी त्यातील चार जणांना अटक केली आहे. या हत्येच्या घटना रविवारी रात्री घडली, त्यापूर्वी आंदेकर याने चौथ्या श्रावण सोमवारी मंदिरात पूजा केली होती आणि दहीहंडी उत्सवातही सहभाग घेतला होता. हे दोन कार्यक्रम आंदेकर याच्या शेवटच्या इंस्टाग्राम पोस्ट ठरल्या.

सीसीटीव्ही फुटेजमधून हल्ल्याचा प्रकार समोर

या हत्येचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागला आहे. फुटेजमध्ये दिसते की, सहा दुचाकींवर स्वार होऊन १२ जण आंदेकर यांच्या दिशेने येत आहेत आणि त्यांनी हातात शस्त्रे घेऊन आंदेकर याच्यावर हल्ला केला. हल्ल्याच्या वेळी आंदेकर हे एकटेच होते. हल्लेखोरांनी आधी आंदेकर यांच्यावर गोळीबार केला आणि नंतर कोयत्याने वार केले. हल्ल्याच्या आधी चौकातील लाईट बंद करण्यात आली होती. गंभीर जखमी झालेल्या आंदेकर याला केईएम रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

चार आरोपींना अटक-

पुणे पोलिसांनी या प्रकरणी तातडीटी कारवाई करत चार जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या मते, हा हल्ला घरगुती आणि मालमत्तेच्या वादातून झाला आहे. मृतक वनराज आंदेकर यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आंदेकर यांच्या दोन बहिणी आणि त्यांच्या पतींवर शंका व्यक्त करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे जयंत कोमकर, गणेश कोमकर, संजीवनी कोमकर, आणि कल्याणी कोमकर आहेत.

पुणे क्राइम ब्रांचची तपासणी सुरु-

ही हाय-प्रोफाईल हत्या पुणे क्राइम ब्रांचच्या तपासणीखाली आहे. प्राथमिक तपासात हे समोर आले आहे की, हल्लेखोरांनी परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न केला आणि स्ट्रीट लाईट बंद केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, काही लोकांनी हल्लेखोरांवर काही फेकले, पण ते त्यांना लागले नाही. स्कूटरवर दोन मुलांसोबत एक व्यक्ती गुंतागुंतीतून जीव वाचवत घटनास्थळावरून निघून गेला.

वनराज आंदेकर याच्या हत्या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या हातात असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. हत्येच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी परिसरातील सुरक्षा वाढवली आहे आणि घटनेच्या संदर्भात अधिक तपास सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.