Vanraj Andekar murder reason
पुणे- वनराज आंदेकर यांच्या झालेल्या निर्घुण खुनामुळे महाराष्ट्र हादरला आहे. आंदेकर हत्या प्रकरणी पुणे पोलिसांची २० पथके हल्लेखोरांच्या शोध घेत आहेत. आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच राउंड फायर केले होते. त्यापैकी एक गोळी मिसफायर झाली. त्यानंतर वनराज यांच्यावर कोयत्याने वार केले गेले. त्यात शरीरावर १२ ठिकाणी जखमा झाल्या होत्या.
पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची २० पथके पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस सहआयुक्त यांनी दिली. कौटुंबिक संपत्तीच्या वादातून ही हत्या घडवून आणण्यात आली आहे. बहिणींनी आपल्या नवऱ्यांना हाताशी धरून हे कृत्य केले आहे. सदर घटनेमुळे पुण्यातील कायदा व व्यवस्तेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.