Plane : वाराणसीहून पुण्याला येणारे विमान अचानक रद्द; प्रवासी संतापले

वाराणसीहून पुण्याला येणाऱ्या ‘इंडिगो’चे (६इ ६८८४) विमान अचानक रद्द झाले. त्यावेळी प्रवासी संतापले. काही प्रवाशांनी वाराणसी विमानतळावर गोंधळ घातला.
plane
PlaneSakal
Updated on

पुणे - वाराणसीहून पुण्याला येणाऱ्या ‘इंडिगो’चे (६इ ६८८४) विमान अचानक रद्द झाले. त्यावेळी प्रवासी संतापले. काही प्रवाशांनी वाराणसी विमानतळावर गोंधळ घातला. समाज माध्यमांवरही याचे तीव्र पडसाद उमटले.

दरम्यान, काहींनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रशासनाला व विमान कंपनीला आवश्यक त्या सूचना देऊन दुसऱ्या विमानाची सोय करण्यास सांगितले. त्यानंतर दुसऱ्या विमानाची सोय झाली.

अखेर २०० प्रवाशांना घेऊन हे विमान दुपारी सकाळी १० वाजून ५६ मिनिटांनी झेपावले. ते दुपारी १२ वाजून ३२ मिनिटांनी पुणे विमान्यातळावर दाखल झाले.

हे उड्डाण रविवारी पहाटे तीन वाजता उड्डाण होणार होते. मात्र कोणतेही कारण न देंता ते रद्द करण्यात आले.

त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. ही बाब मंत्री मोहोळ यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने दुसरे विमान उपलब्ध करण्यास सांगितले. यावेळी प्रवाशांनी मोहोळ यांचे आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.