Vasant More Resign: साहेब मला माफ करा..., वसंत मोरेंचा मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र! आता कोणत्या पक्षात जाणार?

Vasant More Resign: आज सोशल मिडीयावर पोस्ट करत वसंत मोरे यांनी राजीनामा दिला आहे, त्यांच्या या निर्णयामुळे आगामी निवडणुकीमध्ये मनसेला मोठा धक्का बसणार आहे.
Vasant More Resign
Vasant More ResignEsakal
Updated on

पुणे मनसेचे फायर ब्रँड नेते अशी ओळख असलेल्या वसंत मोरे यांनी मोठा निर्णय घेत मनसेला राम-राम ठोकला. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभा, दौरे, बैठका घेत असतानाच पुण्यात मोठा धक्का बसला आहे.

वसंत मोरे नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. ते वारंवारं आपली नाराजी देखील व्यक्त करत असे. अशातच, आज सकाळी त्यांनी फेसबुक वरून पोस्ट लिहून नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर फेसबुक पोस्ट करत त्यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे.

वसंत मोरे यांनी अनेकदा आपली खदखद व्यक्त केली होती. त्याचबरोबर वसंत मोरे वरिष्ठ नेत्यांवरही नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यांनी आज सकाळी फेसबुकवरती एक पोस्ट केली होती, त्यानंतर दुपारी त्यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांचा राजीनामा राज ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Vasant More Resign
Baramati Lok Sabha Election: ताई की वहिनी? पवार घराण्यातील हाय व्हॉल्टेज लढतीमागे आहे मोठा इतिहास, काय आहे बारामतीची समीकरणे, जाणून घ्या

सकाळी केली होती ही पोस्ट

वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट

''एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो...

त्यानंतर ना कोणाकडे तक्रार कतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो...''

अशी पोस्ट मनसे नेते वसंत मोरे यांनी केली आहे. त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली असून ते काही वेगळा निर्णय घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

Vasant More Resign
Cabinet Meeting : शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे 19 निर्णय

राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे यांची प्रतिक्रिया

मी लवकरच माझी भूमिका जाहीर करेन. अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. पक्षातील काही नेत्यांकडून त्रास होत होता. पुणे शहरात मी लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक होतो. त्याचबरोबर पक्षातील अंतर्गत गोष्टी. वारंवारं माझ्यावर होणारे आरोप. मी स्वांतत्र्य राजकारण करत असल्याचा आरोप होत होता. माझ्या वागणुकीवर आणि चरित्र्यावर आरोप केले जात होते. मी आता मनसे सोडली आहे. मी सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. मी आता संघटेनेमध्ये नाही. माझी पुढील भूमिका पुणेकर ठरवतील, असंही ते पुढे बोलताना म्हणाले आहेत.

Vasant More Resign
Coastal Road : दिव्यांगांच्या वाहनांना कोस्टल रोडवर प्रवेश नाही; प्रवास करण्यापूर्वी 'हे' नियम वाचा

वसंत मोरे यांचे राजीनामा पत्र

प्रति,

मा. श्री राजसाहेब ठाकरे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

विषयः माझा पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारणे संदर्भात.

आपणांस सप्रेम जय महाराष्ट्र..!

पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून 'कोंडी' करण्याचे 'तंत्र' अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती.

Vasant More Resign
Vijay Shivtare : ''नरेंद्र मोदी विचार मंच स्थापन करुन पवारांच्या विरोधात लढणार'', विजय शिवतारेंनी जाहीर केली भूमिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()