"...अन् मी त्यांचा दीर झालो"; काय घडलं वसंत मोरेंसोबत?

राजस चौकात त्यांचा दीर घ्यायला येईल पण १५ मिनिटं झाले कोणीच येत नाही, फोनही लागत नव्हता आणि रिक्षाही मिळत नव्हता.
Vasant More
Vasant MoreSakal
Updated on

पुणे : मनसे नेते वसंत मोरे यांच्यासोबत काल रात्री एक घटना घडली आहे. यांनी काल रात्री उशीरा माणुसकी दाखवत एका महिला प्रवाशाची मदत केली. यासंदर्भात त्यांनी ट्वीट करत महिलांच्या सुरक्षेबाबत आवाहन केले आहे. वसंत मोरे यांनी कोंढवा चौकात एका लहान मुलासोबत उभ्या असलेल्या महिलेल्या तिच्या घरापर्यंत सोडलं आहे. रात्रीच्या पावणेबारा वाजता घडलेल्या या घटनेची माहिती त्यांनी आपल्या ट्वीटरवरून शेअर केली आहे.

(Vasant More News)

Vasant More Twiter
Vasant More TwiterSakal

त्यांनी ट्वीट करत लिहिलंय की,

वेळ रात्री ११.४५ ची. ठिकाण कात्रज - कोंढवा राजस चौक, पुणे. काल नेहमीप्रमाणे चौकातील भटक्या कुत्र्यांना खायला घालायला गेलो तर एक पीएमपीएमएलची बस पूर्ण लाईट लावून उभी होती आणि गाडीचा कंडक्टर गाडीभोवती फिरत होता. ड्रायव्हर त्याच्या सीटवर बसून होता. थोडा संशय आला म्हणून कंडक्टरला विचारले काय प्रकार आहे तेव्हा ते म्हणाले की आम्ही सासवडवरून आलोय, गाडीत एक महिला आहे तिला छोटे बाळ आहे. त्या इकडे बाजूला राहतात. निघताना सांगितले होते की, त्यांना राजस चौकात त्यांचा दीर घ्यायला येईल पण १५ मिनिटं झाले कोणीच येत नाही, फोनही लागत नाही. आम्हाला धड गाडी सोडता येईना आणि त्यांना पण, आणि आता रिक्षाही मिळत नाही असं कंडक्टर म्हणाला.

Vasant More News
Vasant More NewsSakal

मग मी म्हटलं त्यांचा दीर नाही आला म्हणून काय झालं मीच त्यांचा दीर झालो त्या ताईला गाडीत घेतले आणि सुखरूप घरी पोहचवले. घराच्या दारात पोचवले म्हणून फोटोही काढला. पण खरे धन्यवाद त्या MH 12 RN 6059 बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरला! त्यांनी इतक्या रात्री त्या ताईला एकटी उतरू नाही दिली. त्या दोघांची नावे नागनाथ नवरे आणि अरुण दसवडकर!

यात एक चूक घरच्यांची, एकटी ताई इतक्या रात्री इतक्या पिशव्या घेऊन का सोडली? बर सोडली तर मग नेण्यासाठी इतका निष्काळजीपणा का केला? थोडे तरी शहाणे व्हा.

असं ट्वीट करत त्यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत काळजी करण्याचे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()