पुणे : ‘वसंत’ चित्रपटगृह आधुनिक सेवेंसह आजपासून रसिकांच्या सेवेत

मल्टिप्लेक्ससारख्या अद्ययावत सुविधांनी नटलेले वसंत चित्रपटगृह आजपासून ‘वसंत सिनेप्रो’ या नावाने पुन्हा एकदा रसिकांच्या सेवेत रुजू होत आहे.
Vasant Takies
Vasant TakiesSakal
Updated on

पुणे : पुण्याच्या बुधवार पेठेतील वसंत चित्रपटगृह म्हणजे एकेकाळच्या सिनेरसिकांचे हक्काचे ठिकाण. आज पन्नाशी-साठी गाठलेली पुणेकरांची पिढी वसंत चित्रपटगृहात पाहिलेल्या सिनेमांची आणि त्या चित्रपटगृहांच्या वैभवाची आठवण नव्या पिढीला कौतुकमिश्रित अभिमानाने सांगते. हेच चित्रपटगृह आता नवी कात टाकत आहे. मल्टिप्लेक्ससारख्या अद्ययावत सुविधांनी नटलेले वसंत चित्रपटगृह आजपासून ‘वसंत सिनेप्रो’ या नावाने पुन्हा एकदा रसिकांच्या सेवेत रुजू होत आहे.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे वसंत चित्रपटगृह बंदच होते. याच काळात चित्रपटगृहाचे रुपडे पालटण्यात आले. जुन्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासह काही नवीन सोयींचा अंतर्भावही यात करण्यात आला. सध्या चित्रपटगृहात अत्याधुनिक वातानुकूलीत यंत्रणा बसवण्यात आली आहे. तसेच आरामदायी खुर्च्यांची आसनव्यवस्था, नव्याने बांधलेला स्वच्छतागृहे अशा सुधारणाही करण्यात आल्या आहेत. मल्टिप्लेक्सच्या जमान्यात एकपडदा चित्रपटगृहांची उपेक्षा होत असताना या नूतनीकरणामुळे रसिकांची वर्दळ वाढेल, अशी अपेक्षा चित्रपटगृहाचे मालक मोहन टापरे यांनी व्यक्त केली.

Vasant Takies
पत्रकारितेवर पुन्हा प्रहार

‘‘साधारण २००९-१० च्या दरम्यान मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांचा भाव वधारू लागला आणि एकपडदा चित्रपटगृहांना उतरती कळा लागली. सरकारकडून करातही फारशी सवलत मिळत नसल्याने एकपडदा चित्रपटगृहांना व्यवसाय करणे, जिकीरीचे होऊ लागले होते. २०१९ पासून कोरोनामुळे तर चित्रपटगृह पूर्णपणे बंदच होते. व्यवसायही तोट्यात होता, मात्र चित्रपटगृह विकणे शक्य नव्हते. म्हणून ‘सिनेप्रो’ या कंपनीसह भागीदारी करण्याचा निर्णय घेतला. आज प्रदर्शित होत असलेल्या ‘पावनखिंड’ या मराठी चित्रपटासह पुन्हा एकदा चित्रपटगृह रसिकांसाठी खुले होत आहे’’, असे टापरे यांनी सांगितले.

१११ वर्षांचा गौरवशाली इतिहास

वसंत चित्रपटगृहाला तब्बल १११ वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. प्रारंभी इथे किर्लोस्कर नाट्यगृह होते. पुढे १९४७ मध्ये त्याच्या जोडीला सिनेमागृह देखील सुरू करण्यात आले. तर १९५५ मध्ये नाट्यगृह बंद झाल्याने केवळ सिनेमागृह म्हणून ‘वसंत चित्रपटगृह’ ओळखले जाऊ लागले. १९७२ ते १९७५ या काळात तीन मजल्यांचे दोन मजल्यात रुपांतर करण्यात आले. तर १९९७ मध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले. यात चित्रपटगृहाची आसनक्षमता ८०७ वरून ३५० इतकी कमी करण्यात आली. त्यानंतर थेट २०२१-२२ मध्येच बदल करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.