पुणे : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने इयत्ता तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘वीर गाथा प्रकल्प’ (Veer Gatha Project) ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील इयत्ता तिसरी ते इयत्ता पाचवीच्या गटात पुण्यातील आरिव राज चोप्रा (Ariav Chopra) याने राष्ट्रीय स्तरावर चौथ्या क्रमांक पटकाविला आहे.
आरिव हा इयत्ता चौथीत असून खराडी येथील फिनिक्स वर्ल्ड स्कूलमध्ये शिकत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने इयत्ता तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘वीर गाथा’ ही स्पर्धा आयोजित केली होती. देशातील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) आणि सीबीएसई संलग्न सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी २१ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत ही स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत शौर्य गाथा, सैन्यातील वीरांच्या यशोगाथा मांडण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. विद्यार्थ्यांना स्पर्धेतील प्रकल्पातंर्गत ‘वीर गाथा’ या कविता, निबंध, चित्रकला, ‘मल्टीमिडिया’चा वापर करून केलेले सादरीकरण याद्वारे सादर करण्यास सांगण्यात आले होते.
या स्पर्धेतंर्गत देशभरातील २५ विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या गटात म्हणजेच इयत्ता तिसरी ते इयत्ता पाचवीच्या गटात आरिवचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी जवळपास आठ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यातील १९ हजार १२३ प्रवेशिका निवडण्यात आल्या होत्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.