कॅंटॉन्मेंट : हिन्दुधर्मातील गौ रक्षक, धर्म पालक, एकता व समानतेचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेल्या भगवान श्री वीर गोगादेव यांच्या जन्मोत्सवाची जय्यत तयारी मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने शहराच्या ठिकठिकाणी करण्यात आली आहे.
शिव अवतारी भगवान गोरक्षनाथ यांच्या महाप्रसाद 'गुगल' मुळे महारानी बाछल यांना गोगा जाहरवीर हे वीर पुत्र म्हणून प्राप्त झाले. गोगाजींचा जन्म भादवा नवमी या तिथीस झाला. उत्तरेत भाद्रपद असते तर आपल्याकडे श्रावण मासात हा उत्सव साजरा केला जातो.