हडपसर : ओद्योगिक वसाहतीत पदपथावर वाहनांची पार्किंग ?

प्रशासनाची कारवाई करणेस टाळा टाळ, नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावरुन चालावे लागत आहे.
नामांकित चारचाकी कंपनीचे सर्व्हिस सेंटरची वाहने पदपथावर उभी असल्याने पादचाऱ्यांना रस्त्याच्या मधोमध चालवे लागत आहे.’
नामांकित चारचाकी कंपनीचे सर्व्हिस सेंटरची वाहने पदपथावर उभी असल्याने पादचाऱ्यांना रस्त्याच्या मधोमध चालवे लागत आहे.’sakal
Updated on

हडपसर : ओद्योगिक वसाहतीत अनेक छोटे-मोठे उद्योग धंदे, कचरा प्रकल्प, बँका, दुचाकी व चारचाकी वाहनांची सर्व्हिस सेंटर, तसेच महावितरण चे कार्यालय आहे. या ठिकाणी येणारे नागरिक हडपसर ओद्योगिक वसाहतीतील पदपथाचा वापर करीत असतात. परंतु या वसाहतीत असणाऱ्या नामांकित चारचाकी कंपनीच्या सर्व्हिस सेंटर ची वाहने पदपथावरच उभी केली जात आहेत. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे.

किर्लोस्कर चौक या रस्त्यावर नामांकित चारचाकी कंपनीचे सर्व्हिस सेंटर आहे. या ठिकाणी दुरुस्ती साठी येणारी वाहने पदपथावर गेल्या अनेक महिन्यांपासून पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे नागरिकांना तसेच लहान शाळकरी मुलांना स्वतः चा जीव मुठीत धरून रस्त्याच्या मधोमध चालावे लागत आहे. सदर रस्ता अरुंद आहे, शिवाय रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या अवजड व छोटया वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो. पदपथावर वाहने उभी केल्याने महापालिकेच्या सफाई कामगारांना पदपथावरील साफ-सफाई करता येत नाही.

नामांकित चारचाकी कंपनीचे सर्व्हिस सेंटरची वाहने पदपथावर उभी असल्याने पादचाऱ्यांना रस्त्याच्या मधोमध चालवे लागत आहे.’
कापसाच्या झाल्या वाती, उडिदाला फुटले कोंब! सोयाबीनही गेले मातीत

पदपथावर वाहने उभी केली जात असल्याने नागरिकांना पदपथाचा वापर करता येत नाही. मग हे पदपथ नक्की वाहने उभी करण्यासाठी आहे की चालण्यासाठी? असा संतप्त सवाल या मार्गे दररोज प्रवास करण्याऱ्या पादचारी स्वाती भोसले यांनी केला आहे.

“रस्त्यावरच्या वाहनांवर आम्ही कारवाई करतो, सदर चारचाकी कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला आम्ही नोटीस देखील दिली आहे, परंतु हि वाहने फुटपाथ वर असल्याने फुटपाथ वरील वाहनांवर कारवाई पुणे महापालिकेने करणे अपेक्षित आहे, याबाबत आम्ही महापालिकेला पत्र व्यवहार देखील केला आहे.”

- मनीषा झेंडे (पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग- हडपसर)

“पदपथासाठी लाखो रुपये खर्च करून या पदपथाचा वापर वाहने उभी करण्यासाठी होत असेल तर याकडे संबधित प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, परंतु प्रशासन मात्र कारवाई करणेस टाळा टाळ करीत आहे.”

- ज्ञानेश्वर कांबळे संस्थापक-अध्यक्ष, प्रथम शिक्षण मंडळ पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.