Pune Vetal Hill : वेताळ टेकडी वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी साकडे

वेताळ टेकडी बचाव कृती समितीने त्याविरोधात आंदोलन करून प्रक्रिया रद्द करण्याची केली मागणी.
pune Vetal Hill
pune Vetal HillSakal
Updated on

पुणे - वेताळ टेकडीवरून जाणाऱ्या बालभारती पौड फाटा प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, ठरावीक बांधकाम व्यावसायिकासाठी बदलण्यात येणारी अलाइमेंट याविरोधात वेताळ टेकडी बचाव कृती समिती आक्रमक झाली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडण्यासाठी समितीने वेळ द्यावी अशी मागणी शिंदे यांच्याकडे केली आहे.

विधी महाविद्यालय रस्त्यावरील भविष्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि त्यास पर्यायी रस्ता मिळावा यासाठी बालभारती ते पौड फाटा हा २.१ किलोमीटरचा वेताळ टेकडीवरून रस्ता प्रस्तावित केला आहे. या प्रकल्पासाठी २३६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे.

pune Vetal Hill
Teacher Recruitment : शिक्षण विभागाने रखडवली शिक्षकांची नियुक्ती

महापालिकेने याची निविदा प्रक्रिया सुरू करण्याची तयारी सुरू केलेली असताना वेताळ टेकडी बचाव कृती समितीने त्याविरोधात आंदोलन करून ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकल्पासंदर्भात माहिती अधिकार कायद्याअंतर्गत प्रकल्पाची माहिती मागवून त्यातून पालिकेच्या कामातील त्रुटींवर बोट ठेवले आहे. त्यासंदर्भात अद्याप महापालिकेतर्फे खुलासा करण्यात आलेला नाही.

महापालिकेने नियुक्त केलेल्या सल्लागाराने या प्रकल्पासंदर्भात जे अहवाल तयार केले, ते महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केले. पण कृती समितीने माहिती अधिकार कायद्यातून प्राप्त केलेले अहवाल आणि संकेतस्थळावरील अहवाल यात मोठ्या प्रमाणात तफावत आहे.

pune Vetal Hill
Pune Weather : पुणे शहरात ढगाळ हवामान कायम; उन्हाचा चटका होणार कमी

सल्लागाराने महापालिका आयुक्तांची परवानगी न घेता रस्त्याच्या अलाईमेंटमध्ये बदल केले आहेत. महापालिकेने सल्लागारास हे स्वातंत्र्य दिले आहे का?, असा प्रश्‍न कृती समितीने उपस्थित केला आहे. यासह इतर गंभीर त्रुटींवर म्हणणे मांडण्यासाठी वेताळ टेकडी बचाव कृती समितीने मुख्यमंत्र्यांना भेटीची वेळ मिळावे यासाठी इमेल पाठवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()