पुणे : अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तसेच ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक नागनाथ कोतापल्ले याचं अल्पशा आजारानं निधन झालं, ते ७४ वर्षांचे होते. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. (Veteran literary critic Nagnath Kottapalle passes away)
एक वर्षापूर्वी डॉ. कोत्तापल्ले यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. तेव्हापासून पिंपरी- चिंचवडच्या राहत्या घरी सून आणि मुलगा त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. परंतु, गेल्या १५ दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तात्काळ पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती.
नागनाथ कोत्तापल्ले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु होते. तसेच चिपळूनण इथं पार पडलेल्या ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी अनेक पुस्तकांचं लेखन तसेच समीक्षापर लेखन केलं. यामध्ये पापुद्रे, ग्रामीण साहित्य : स्वरुप आणि शोध, नवकथाकार शंकर पाटील, साहित्य अन्वयार्थ, मराठी कविता एक दृष्टीक्षेप, साहित्याचा अवकाश हे त्यांचं समीक्षणपर लेखन प्रसिद्ध आहे.
हे ही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता..
कोत्तापल्ले यांचा परिचय -
नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च, १९४८ रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झाला. त्यांचं शालेय शिक्षण मुखेडच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये झालं त्यानंतर बीए मराठीचे शिक्षण त्यांनी देगलूर महाविद्यालयातून पूर्ण केलं यामध्ये ते मराठवाड्यात तिसरे तर मराठी विषयात पहिले आले.
१९८० मध्ये औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून डॉ. यु. म. पठाण सरांच्या मार्गदर्शनाने 'शंकरराव पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास' या विषयावर त्यांनी पीएच. डी. चं संशोधन केलं. ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख होते तसेच २००५ पासून २०१० पर्यंत कोतापल्ले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिलं. दरम्यान, नॅक, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बालपुरस्कार समिती आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असं कामही त्यांनी पाहिलं.
कोत्तापल्ले यांना मिळालेले पुरस्कार-
पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्य सम्राट न. चिं. केळकर साहित्य पुरस्कार
महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार -
मूड्स (१९७६)
संदर्भ (१९८४)
गांधारीचे डोळे (१९८५)
ग्रामीण साहित्य (१९८५)
उद्याच्या सुंदर दिवसासाठी (२००२)
'ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध'साठी परिमल पुरस्कार (१९८५)
'ज्योतिपर्व साठी केशवराव विचारे पारितोषिक (२००२)
दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन सूर्योदय साहित्यरत्न पुरस्कार (२०१८)
यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार (२००१)
'राख आणि पाऊस'साठी बी. रघुनाथ पुरस्कार (१९९५)
'राख आणि पाऊस'साठी महात्मा फुले पुरस्कार (१९९५)
'साहित्य अवकाश'साठी शिरीष गांधी साहित्य पुरस्कार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.