लग्नास नकार दिल्याने तरुणीचे व्हिडीओ फेसबुकवर टाकून बदनामी

धानोरीत घरात घुसलेल्या अनोळखी व्यक्तीकडून महिलेला मिठीत घेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस
फेसबुक
फेसबुकsakal
Updated on

पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागात तरुणीसह महिलेच्या विनयभंगाच्या दोन घटना घडल्या. सदाशिव पेठेतील तरुणीने लग्नास नकार दिल्याने एकाने तिच्यासमवेतची छायाचित्रे, व्हिडीओ फेसबुकवर तिची बदनामी केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर धानोरी येथे घरात घुसलेल्या एका अनोळखी व्यक्तीने महिलेस मिठीत घेत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून त्याच्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. (PUNE News)

याप्रकरणी सदाशिव पेठेतील 28 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार सुध्दांत भगवान जावळे (वय 30, रा. माजलगाव, बीड) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरूणी व संशयित आरोपी जावळेसमवेत ओळख आहे. आरोपीने तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. परंतू तुरूणीने त्याच्यासमवेत लग्न करण्यास नकार दिला होता. त्या रागातून जावळेने तरुणीला तिची बदनामी करण्याची भिती दाखवून तिच्याकडे पैशांची मागणी केली.

फेसबुक
स्मशानभूमीची राख सावडणार व्हॅक्यूमक्लीनरने

तेवढ्यावरच न थांबता त्याने तरुणीसमवेत काढलेली छायाचित्रे फेसबुकवर प्रसारीत केली. तरुणीची छायाचित्रे व व्हिडीओ तरुणीच्या नातेवाईक व इतर जवळच्या व्यक्तींना दिसतील, त्याद्वारे तिची बदनामी होईल. अशा पद्धतीने प्रसारीत करून तरुणीचा विनयभंग केला. हि घटना घडूनही तरुणीने त्यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तरीही तो तरुणीचा सतत पाठलाग करून तिला त्रास देत होता. अखेर या सगळ्या प्रकाराला कंटाळून तरुणीने विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली.

दरम्यान, धानोरी येथील मुंजाबा वस्ती परिसरात राहणारी 30 वर्षीय महिला दोन दिवसांपुर्वी तिच्या मुलाला शिकवणी वर्गाला घेऊन जाण्यासाठी त्याची तयारी करीत होती. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती अचानक महिलेच्या घरात घुसला. त्याने फिर्यादीच्या मुलाला मारण्याची धमकी देऊन महिलेस मिठीत घेत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास विश्रांतवाडी पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.