पुण्यातील वाहतुकीचा विषय दिवसेंदिवस गंभीर बनला आहे. काही वर्षांपूर्वी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि पीएमपी बसचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी बीआरटीचा मार्ग निर्माण करण्यात आला. ही व्यवस्थाही वाहनांच्या प्रचंड संख्येमुळं कोलमडून पडली आहे.
पण ज्या मार्गांवर ही व्यवस्था सुरु आहे. तिथं सर्रास इतर वाहनं बीआरटी मार्गातून जाताना दिसतात. त्यामुळं या जलद बस व्यवस्थेचीही वाट लागली आहे. नुकतेच या बीआरटी मार्गातून एक कार उलट्या दिशेनं निघाली होती, पण बस चालकानं त्याला योग्य मार्ग दाखवला. याला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.