Sharad Pawar: राजकारण बाजूला, मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना साथ राहील; शरद पवारांनी केलं बारामती मध्ये स्वागत

vidya pratishthan baramati namo rojgar melawa कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, निलम गोरे इत्यादी नेते उपस्थित होते.
sharad pawa esakal
sharad pawa esakal
Updated on

पुणे- बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या संस्थेत नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, निलम गोऱ्हे इत्यादी नेते उपस्थित होते. शरद पवार यावेळी आपल्या भाषणात म्हणाले की, राज्याची रोजगार निर्मिती करण्याची क्षमता आहे. या मुद्द्यावर आमची सरकारला साथ असेल.

रोजगारनिर्मितीकडे सरकारनं लक्ष दिल्याने त्यांचे आभार मानतो. राज्यात रोजगार निर्माण करण्याची गरज आहे. राजकारण बाजुला राहिलं. पण, मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या मुद्द्यावर आमची साथ राहील, असं शरद पवार म्हणाले आहेत. (vidya pratishthan baramati namo rojgar melawa ncp sharad pawar speech)

sharad pawa esakal
Law News: 2 पेक्षा जास्त मुलं असलेल्यांना सरकारी नोकरी नकोच; सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हणाले?

मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विद्या प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करताना मला आनंद होत आहे. ही संस्था १९७१ साली स्थापन झाली, आज ३० हजारपेक्षा जास्त विद्यार्थी या संस्थेत शिकतात. रोजगाराच्या संबंधित हा कार्यक्रम आहे. राज्य सरकारांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की, आज रोजगार निर्माण करण्याची गरज आहे आणि राज्य सरकार ते काम करत आहे, असं शरद पवार म्हणाले.

गेल्या पाच वर्षांमध्ये या संस्थेतून जी मुलं बाहेर पडली त्या इंजिनियरच्या १५०० मुलांना नोकरी मिळाली आहे. १ लाखांपेक्षा जास्त मुलींना नोकरी मिळाली आहे. अनेक कंपन्यांमध्ये या संस्थेतील मुलं काम करत आहेत. संस्थेमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी वेगळा विभाग सुरु केला आहे. तसेच जगातील पाऊलं ओळखून एआयचा देखील आम्ही वापर सुरु करणार आहोत, असं ते म्हणाले.

sharad pawa esakal
Flight Services : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' कारणामुळं बेळगाव-पुणे विमानसेवा बंद

राज्य सरकार महत्त्वाची पाऊलं टाकतंय ही समाधानाची गोष्ट आहे. राजकारण बाजुला राहिलं. जिथं नवीन काही करत आहेत. तरुणांना आधार देत आहेत अशी भूमिका असेल तर सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. तीच भूमिका घेऊन आम्ही मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खात्री देतो की तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी तुम्ही जे जे कराल त्यासाठी आमची तुम्हाला साथ असेल, असं ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.