स्लम ‘स्लम सॉकर’ चे प्रणेते विजय बारसे यांचे चरित्र व झोपडपट्टीतील मुलांसाठीचे कार्य दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी झुंड चित्रपटातून जगासमोर आणले आहे.
हडपसर - ‘झोपडपट्टी फुटबॉल लीग’ची सुरुवात केलेल्या विजय बारसे (Vijay Barse) यांना केंद्र सरकारकडून पद्म तर राज्य सरकारकडून (State Government) महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) दिला जावा, अशी मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने (Omega Christian Mahasangh) मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
स्लम ‘स्लम सॉकर’ चे प्रणेते विजय बारसे यांचे चरित्र व झोपडपट्टीतील मुलांसाठीचे कार्य दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी झुंड चित्रपटातून जगासमोर आणले आहे. विजय बारसे हे नागपूरच्या एका कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलची ट्रेनिंग देऊन खेळाडू बनवले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. त्यांनी ‘स्लम सॉकर’ नावाच्या लीगचीही स्थापना केली. आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमात त्यांची प्रेरणादायी कथा दाखवण्यात आली आहे.
बारसे यांनी त्यांच्या या कार्याच्या माध्यमातून पुढे २००२ साली ‘झोपडपट्टी फुटबॉल लीग’ची सुरुवात केली. कालांतराने हाच खेळ ‘स्लम सॉकर’च्या नावाने प्रसिद्ध झाला. जागतिक पातळीवर तो नावाजला गेला आहे. समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तींना योग्य वळण देवून भारत देशाचे नाव जगात उंचावण्याचे महान कार्य विजय बारसे यांनी केलेले आहे. या कार्याची दखल घेवून त्यांना भारत सरकारने पद्म व महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.