कुरकुंभ परिसरात गावठी दारूविक्री राजरोजपणे

राजकीय वरदहस्त व अर्थपूर्ण संबंधांमुळे पोलिसांकडून कारवाई होत नसल्याची पालकांची संतप्त प्रतिक्रिया
Village liquor sale in Kurkumbh area daily
Village liquor sale in Kurkumbh area daily
Updated on

कुरकुंभ - दौंड तालुक्यातील कुरकुंभ व रावणगाव पोलिस मदत केंद्रातंर्गत येणाऱ्या गावांमध्ये गावठी, देशी दारू, मटका, जुगार, बंगार, डिझेल, पेट्रोल, खाद्यतेल व केमिकल चोरी इत्यादी अवैधधंदे खुलेआम चालू आहेत. हे थोडे की काय म्हणून खडकी येथील विद्येचे मंदिर असलेल्या जिल्हा परिषद शाळेपासून काही अंतरावर गावठी दारूविक्री राजरोजपणे केली जात आहे. राजकीय वरदहस्त व अर्थपूर्ण संबंधांमुळे पोलिसांकडून कारवाई होत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया पालक व्यक्त करीत आहेत.

दौंड पोलिस चौकीतंर्गत कुरकुंभ व रावणगाव पोलिस मदत केंद्रांचा समावेश आहे. परिसरातील कायदा सुव्यवस्था चांगली राहावी यासाठी या पोलिस मदत केंद्रामध्ये एक अधिकारी व काही पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कुरकुंभ मदत केंद्रांतर्गत कुरकुंभ एमआयडीसी, पांढरेवाडी, जिरेगाव, कौठडी, वासुंदे या गावांचा समावेश आहे. तर रावणगाव मदत केंद्रांतर्गत मळद, रावणगाव, नंदादेवी, खडकी, स्वामी चिंचोली ही गावे येतात. या दोन्ही मदत केंद्रांतर्गतील गावांमध्ये गावठी, देशी दारूविक्री, मटका, जुगार इत्यादी अवैधधंदे जोमात सुरू आहेत.

तसेच पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतचे ढाबे व हाॅटेलांमध्ये दारूविक्री केली जाते. वाहनांमधून खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल, सिमेंट, लोखंड चोरी केली जाते. एमआयडीसीतील कंपन्यांमधील भंगार, केमिकल चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. खडकी येथील जिल्हा परिषद शाळेपासून काही अंतरावर व गावातील मुख्य रस्त्यालगत गावठी दारूविक्री केली जात आहे. दारूपिल्यानंतर दारूडयांकडून होणारी शिवीगाळीमुळे विद्यार्थी, शिक्षक, महिलांची कुचंबणा व त्रास होत आहे.

मात्र गुन्हेगारांवर राजकीय वरदहस्त व अर्थपूर्ण संबंधांमुळे कारवाई केली जात नाही. त्यामुळे वरील अवैध धंद्यामध्ये दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत आहे. त्रास होऊनही सर्वसामान्य नागरिक अवैध धंदेवाल्यांचा पोलिसांबरोबर असणारा वावर व भितीमुळे तक्रार करण्यास घाबरत आहेत. व पोलिसांशी पोलिसांकडून याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने नाराजी व्यक्त आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.